शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जमत नसेल तर आमच्या स्टेजवर येऊन बोला, अब्दुल सत्तारांनी आदित्य ठाकरेंना पुन्हा डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 20:09 IST

छोटा पप्पू म्हणून उल्लेख केल्यानंतर अबदुल सत्तार यांना थेट उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे सिल्लोडमध्ये सभा घेणार आहेत

सिल्लोड (औरंगाबाद) :  कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांच्या सभेची जागा बदलण्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सभा घेण्यासाठी हिम्मत लागते. त्यांना जमत नसेल तर आमच्या सभेत खा. श्रीकांत शिंदे यांचे भाषण झाल्यानंतर  स्टेजवर येऊन बोलावे, असा टोला लगावत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचले.

गेल्या काही दिवसांपासून मंत्री अब्दुल सत्तार आणि आदित्य ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. दरम्यान छोटा पप्पू म्हणून सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता. सत्तार यांच्या आरोपाला थेट उत्तर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ७ नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये सभा घेण्याची घोषणा केली. आदित्य यांनी सभेची घोषणा करताच अब्दुल सत्तार यांनी त्याच दिवशी सिल्लोडमध्ये खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले. दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकातील सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली. काही वेळाने ठाकरे यांच्या सभेस जळगाव - औरंगाबाद रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या शेजारील मैदानात सभेस पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली. मात्र, यामुळे राजकारण राजकारण चांगलेच तापले आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध अब्दुल सत्तार यांच्यातील सामन्यात आता सोमवारी सिल्लोड येथील सभेत कोण वरचढ ठरते याची चर्चा सुरु  झाली आहे. 

तर आमच्या स्टेजवर या, भाषण द्यासभा घेण्यास हिम्मत लागते. सभेस परवानगी मिळाली आहे. आता ही सभा घेता येत नसेल तर आमच्या मंचावर यावे, आमचा स्टेज, माईक, पब्लिक वापरून खा. श्रीकांत शिंदे यांच्या भाषणानंतर काय बोलायचे ते बोलावे असे थेट आव्हान कृषिमंत्री सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे. तसेच सिल्लोड सोयगाव तालुक्यात पब्लिक माझ्या सोबत आहे. आदित्य ठाकरे यांची सभा झालीच पाहिजे म्हणजे दुधका दूध आणि पाणी का पाणी होईल, असेही मंत्री सत्तार म्हणाले.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAditya Thackreyआदित्य ठाकरेAurangabadऔरंगाबाद