शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अक्कल दाढ अन् हुशारीचा संबंध आहे का? या दाढीविषयी गैरसमजच अधिक

By संतोष हिरेमठ | Updated: November 2, 2023 19:39 IST

अक्कल दाढ येणे, ही सर्वसाधारण गोष्ट आहे.

छत्रपती संभाजीनगर : लहान मुलांना जे शेवटचे चार दात येण्यास सुरुवात होते, त्यांना ‘अक्कल दाढ’ असे म्हटले जाते. हे दात कायमस्वरूपी असतात. अक्कल दाढ असे म्हटले जात असले तरी त्यांचा अक्कल, हुशारी आणि बुद्धीशी काहीही संबंध नसतो. उलट चांगले मौखिक आरोग्य असणाऱ्या लोकांनाही त्यांचा त्रास होतो. त्यामुळे त्या काढण्याचीही वेळ ओढवते, असे तज्ज्ञांनी म्हटले.

अक्कल दाढ केव्हा व कशामुळे येते? अक्कल दाढ येणे, ही सर्वसाधारण गोष्ट आहे. साधारणपणे वयाच्या अठराव्या वर्षी अक्कल दाढ येते. काही लोकांना ती सरळ म्हणजे सर्वसामान्य येते. मात्र, काहींना अपूर्ण येते, तर काही जणांना वाकडी येते. अशावेळी त्रास होतो.

अक्कल दाढीविषयी गैरसमजदंत उपचाराच्या भीतीसोबतच अक्कल दाढ काढल्यानंतर व्यक्तीला कायमचे अंधत्व येते, दात कापणे किंवा ते स्वच्छ करण्यामुळे इतर दातांना इजा पोहोचते, असे गैरसमज आजही लोकांमध्ये आहेत.

दात काढला तर दृष्टी कमी होते का?हा गैरसमज यामुळे पसरला आहे की, पूर्वी लोक वय झाल्यानंतर दात काढायचे. त्या वयात नजर कमी झालेली असतेच. यावरूनच असा गैरसमज झालेला आहे की, दात काढल्यावर नजर कमजोर होते. मात्र, दातांचा आणि नजरेचा काही संबंध नसतो.

दात काढल्यानंतर काय काळजी घ्याल? दात, दाढ काढल्यानंतर पाण्याने गुळण्या करू नये. जोरात थुंकू नये. थंड आणि पातळ खावे. ज्यूस पिताना स्ट्रॉ वापरू नये. दंतरोग तज्ज्ञांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्यावी.

अक्कल दाढ येणे सर्वसाधारणअक्कल दाढ हे नाव यामुळे पडले की, या दाढी साधारणपणे वयाच्या १८व्या वर्षी येत असतात. त्या वयात अक्कल येते, असे पूर्वीचे लोक म्हणायचे. मात्र, त्यामुळे अक्कल दाढ आणि हुशारीचा काही संबंध नसतो. अक्कल दाढ येणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे.-डॉ. इंदिरा रोजेकर, दंतरोग तज्ज्ञ.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य