शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

२४ कोटींच्या रस्त्यांच्या कामांत अनियमितता; महापालिका शहर अभियंत्यांवर विभागीय चौकशीत चार दोषारोप सिद्ध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 14:13 IST

Aurangabad Municipal Corporation निविदाप्रक्रियेत अनियमिता झाल्याप्रकरणी चौकशीअंति शहर अभियंता पानझडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता एस. पी. खन्ना यांच्यावर दोषारोप सिद्ध झाले आहेत.

ठळक मुद्दे२४.३३ कोटींतून केलेल्या रस्त्याच्या कामांत अनियमितता असल्याचे उघडरस्त्यांच्या निविदेतील अनियमिततेत २० पैकी चार दोषारोप सिद्ध झाले आहेत.

औरंगाबाद : महापालिकेचे शहरअभियंता सखाराम पानझडे यांच्यावर २४ कोटी ३३ लाख रुपयांतून केलेल्या रस्त्यांच्या निविदेतील अनियमिततेत २० पैकी चार दोषारोप सिद्ध झाले आहेत. विभागीय चौकशीअंति त्यांच्यावर काय कारवाई करायची याबाबत प्रशासक आस्तिककुमार पांडेय हे शुक्रवारी निर्णय घेणार आहेत.

निविदाप्रक्रियेत अनियमिता झाल्याप्रकरणी चौकशीअंति शहर अभियंता पानझडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता एस. पी. खन्ना यांच्यावर दोषारोप सिद्ध झाले आहेत. पानझडे यांच्यावर ठपका ठेवण्यास मनपा प्रशासकांनी मान्यता दिली आहे, तर सिकंदर अली हे सेवानिवृत्त झालेले असल्याने त्यांची १० टक्के पेन्शन कायमस्वरूपी गोठविण्याचा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी पाठविला आहे. सेवानिवृत्त उपअभियंता खन्ना यांच्याबाबतदेखील दोन दोषारोप सिद्ध झाले आहेत.

२०१५ मध्ये शासनाने सिमेंट रस्त्यांसाठी २४ कोटी ३३ लाखांचा निधी दिला होता. या कामांच्या निविदाप्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्य समितीने प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. त्यात पानझडे यांना पूर्वीच्या दोषारोपांसह अतिरिक्त दोषारोपपत्र बजावण्यात आले होते. निविदाप्रक्रियेमध्ये अनियमित्ता आढळून आल्याने पानझडे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे निर्देश नंतर देण्यात आले. समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार पानझडे यांच्याविरुद्ध चार दोषरोप सिद्ध झाले, त्यात सहा अंशत: सिद्ध झाले.

कुठलेही आर्थिक नुकसान नाहीया सगळ्या प्रकरणात पालिकेचे कुठलेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचे चौकशी निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे. पानझडे यांच्यावर २० दोषारोप होते. दहा सिद्ध झाले नसून उर्वरित दहा पैकी चार सिद्ध झाले. सहा अंशत: सिद्ध झाले आहेत. बॉण्ड खरेदीत १८०० रुपयांचा कमी-अधिक खर्च झाल्याचे निरीक्षण चौकशी अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. दोषारोप सिद्ध झाल्याने महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार पानझडे यांच्यावर ठपका ठेवण्याबाबत मनपा प्रशासकांनी मान्यता दिली आहे. तत्कालीन कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्यावरही दोन दोषारोप सिद्ध झाले असून, चार दोषारोप अंशत: सिद्ध झाले आहेत. दरम्यान, शहर अभियंता पानझडे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCorruptionभ्रष्टाचार