शहरं
Join us  
Trending Stories
1
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
4
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
5
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
6
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
7
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
8
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
9
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
10
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
11
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
12
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
13
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
14
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
15
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
16
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
17
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
18
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
19
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?
20
गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट'

विद्यापीठातील ‘पेट’च्या अंतिम गुणवत्ता यादीत अनियमितता; समितीकडून होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:25 IST

व्यवस्थापन परिषद सदस्याने अंतिम गुणवत्ता यादीत अनियमितेचा केला पुराव्यानिशी भांडाफोड

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच. डी. प्रवेश परीक्षेनंतर (पेट) अंतिम गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर केली आहे. या गुणवत्ता यादीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा दावा ॲड. दत्ता भांगे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत पुराव्यानिशी केला. गुणवत्ता डावलून अनेकांना अंतिम यादीत स्थान दिल्याचे सांगितले. त्यावर जोरदार खडाजंगी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या तक्रारींची आणि अंतिम गुणवत्ता याद्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २६) पार पडली. या बैठकीत एकूण १९ विषय चर्चेसाठी मांडण्यात आले. त्यातील काही विषय मंजूर केले, तर काही फेटाळण्यात आले. काहींच्या बाबतीत समितीची स्थापना करण्यात आली. पदवीधर गटातील सदस्य ॲड. दत्ता भांगे यांनी ऐनवेळच्या विषयात व्यवस्थापनशास्त्र विषयातील अमीश झळके हा विद्यार्थी गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकावर असतानाही त्याच्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या उमेदवाराची निवड अंतिम यादीत करण्यात आल्याची कागदपत्रेच सादर केली. त्याशिवाय अर्थशास्त्र, समाजशास्त्र या विषयांच्या गुणवत्ता याद्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. इतर विषयांत अनेक अनियमितता असल्याचे दाखवून दिले. या प्रकारांमुळे खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी आहे. त्यांच्या मनात अन्याय झाल्यामुळे आत्महत्येसारखे विचार येऊ लागले आहेत. यास दोषी असलेल्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी ॲड. भांगे यांनी लावून धरली. त्यास डॉ. योगिता होके पाटील यांनी पाठिंबा देत अनेक विषयांत अनियमितता झाल्याचे सांगितले. त्यावर डॉ. अंकुश कदम, बसवराज मंगरुळे, डॉ. अपर्णा पाटील यांच्यासह इतरांनीही मते मांडली. त्यानंतर चौकशी समिती नेमण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

समितीचा १० दिवसांत अहवालव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत माजी प्र-कुलगुरू तथा सदस्य डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. समितीत डॉ. अंकुश कदम, डॉ. अपर्णा पाटील असणार आहेत. या समितीला दहा दिवसांमध्ये अहवाल द्यावा लागणार आहे. त्याशिवाय पीएच. डी. विद्यार्थ्यांच्या नोंदणीची मुदतही १० दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे.

मुलाखतींसाठी बाहेरील तज्ज्ञपेट परीक्षेनंतर विषय निवडीच्या वेळी घेण्यात येणाऱ्या मुलाखतींसाठी विद्यापीठाच्या कार्यकक्षेबाहेरील प्राध्यापक बोलविण्याचा निर्णयही घेतला. यावेळी ओळखीच्या उमेदवाराला पैकीच्या पैकी मार्क देण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद