शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

चौकशी समिती ठरली ‘फार्स' !

By admin | Updated: August 19, 2014 02:11 IST

संजय तिपाले ,बीड शिक्षक बदल्यांतील अनियमिततेचे प्रकरण स्थायी समितीच्या बैठकीत चांगलेच गाजले होते़ त्यानंतर बदल्यांच्या चौकशीसाठी पदाधिकारी, अधिकाऱ्यांची विशेष समितीही नियुक्त केली होती;

संजय तिपाले ,बीडशिक्षक बदल्यांतील अनियमिततेचे प्रकरण स्थायी समितीच्या बैठकीत चांगलेच गाजले होते़ त्यानंतर बदल्यांच्या चौकशीसाठी पदाधिकारी, अधिकाऱ्यांची विशेष समितीही नियुक्त केली होती;पण तीन आठवडे उलटूनही ना चौकशी झाली ना अहवाल आला़ त्यामुळे मोठा गाजावाजा करुन नेमलेली समिती तूर्त केवळ फार्स ठरली आहे़ जून महिन्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या दर्जावाढीची प्रक्रिया पार पडली होती़ तत्पूर्वीच जिल्ह्यात जवळपास तीनशेहून अधिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने दाखल झाले़ त्यामुळे जिल्ह्यात आधीच अतिरिक्त असलेल्या १३० शिक्षकांच्या संख्येत भर पडली़ बिंदूनामावली निश्चित नसतानाच बदल्यांची प्रक्रि या राबवली गेली़त्यामुळे २४ जुलै २०१४ रोजी पार पडलेल्या स्थायी समिती बैठकीत नियमबाह्य बदल्यांवरुन गदारोळ झाला. बदल्या, दर्जावाढ, नियमबाह्य नियुक्त्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी सदस्यांसह सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. त्यामुळे एक विशेष समिती नियुक्त करुन त्यामार्फत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निश्चित झाले. विजयसिंह पंडित, बजरंग सोनवणे, दशरथ वनवे, महेंद्र गर्जे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती, शिक्षणाधिकारी (प्रा.) एस. वाय. गायकवाड, सर्व गट शिक्षणाधिकारी यांचा विशेष चौकशी समितीत समावेश आहे. दरम्यान, समितीच्या हाती अद्याप काहीच लागलेले नसून चौकशी पुढे सरकलेली नाही. त्यामुळे समिती तूर्त केवळ नावालाच उरल्याचे चित्र निर्माण झाले आहे़सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शिक्षकांच्या बदल्यांतील अनियमितता तपासण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्रा.) एस. वाय. गायकवाड यांना शनिवारी पत्र दिले आहे. एकूण बदल्या, संवर्गनिहाय जागा, रिक्त जागा, अतिरिक्त शिक्षक आदी माहिती मागविली आहे. मात्र, अद्याप माहिती आली नाही. चौकशी सुरु नाही असे नाही. माहिती उपलब्ध होताच येणाऱ्या स्थायी समिती बैठकीत अहवाल सादर करु, असे ते म्हणाले.