शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागात ३ लाखांत प्रमोशन अन् बदली प्रकरणात चौकशी सुरू; अहवाल येताच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:26 IST

याप्रकरणात ‘रडार’वर आलेल्या एका कर्मचाऱ्याने एका पत्राद्वारे आपले म्हणणे आरोग्य उपसंचालकांकडे मांडल्याचे समजते.

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक आरोग्य विभागात अधिपरिचारिका या संवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार परिसेविका या पदावर पदोन्नती तसेच शहराच्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी ३ लाख रुपये मोजावे लागत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. याप्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. कांचन वानेरे यांनी सांगितले.

आरोग्य विभाग, छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील अधिपरिचारिका संवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार परिसेविका या पदावर पदोन्नतीची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर झाल्यानंतर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील टेबलाखालून कारभार करणाऱ्या काहींनी स्वत:चा ‘उद्योग’ सुरू केला. हा प्रकार ‘लोकमत’ने १६ जून रोजी ‘ पदोन्नती अन् शहरात बदली पाहिजे, मग ३ लाख मोजा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणला. याप्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी सकाळीच आरोग्य उपसंचालक कार्यलयात बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. याप्रकरणी समितीने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

कर्मचाऱ्याने मांडले म्हणणेयाप्रकरणात ‘रडार’वर आलेल्या एका कर्मचाऱ्याने एका पत्राद्वारे आपले म्हणणे आरोग्य उपसंचालकांकडे मांडल्याचे समजते. या प्रकरणात सहभाग नसल्याचे या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.

‘पैशांची देवाण-घेवाण होत नाही’आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक फलक आहे. ‘या कार्यालयात कोणत्याही कामासाठी पैशांची देवाण-घेवाण होत नाही. तसे आढळून आल्यास उपसंचालकांशी संपर्क करावा’ असे या फलकावर नमूद आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर