शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बनावट एन-ए परवान्यांची चौकशीची करा; विभागीय आयुक्तांच्या मागणीने खळबळ

By विकास राऊत | Updated: March 20, 2024 14:21 IST

विभागीय आयुक्तांचा धक्कादायक लेटरबॉम्ब; पत्रामुळे महसूलसह प्राधिकरणातील यंत्रणेत प्रचंड खळबळ

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एएमआरडीए) च्या हद्दीच्या विकास आराखड्यात छेडछाड करून एनएच्या (अकृषक परवानगी) परवानगी देण्यात येत आहे. विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड हे प्राधिकरणाचे प्रभारी आयुक्त असताना त्यांनीच स्वत: या सगळ्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नगरविकास संचालकांकडे पत्राद्वारे केल्यामुळे प्राधिकरणासह महसूल विभागात खळबळ उडाली. 

प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींचा गठ्ठा थेट नगरविकास खात्याकडे पाठविल्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. महसूलचे सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी असताना बोगस एनएच्या रॅकेटवर ते कारवाई करू शकतात; परंतु नगरविकास संचालकांना पत्र दिल्यामुळे यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहेत.

महानगर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आदेश देऊन मंजूर आराखड्यातील ना-विकास (नो डेव्हलपमेंट झोन) क्षेत्रामध्ये दिलेल्या दाखल्यात छेडछाड करून व बनावट दस्तऐवज करून अकृषिक परवानगी देण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या गैरप्रकारामुळे शासनाची आर्थिक व नियोजनात्मक हानी होत आहे. याबाबत आपल्या स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे आयुक्तांनी नगररचना विभागाच्या संचालकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नियोजनाचा बट्ट्याबोळ...प्राधिकरणाचा मुद्दा हा महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम १९६६ शी निगडित आहे. तांत्रिक स्वरूपाचा हा गैरप्रकार असून शासनाची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व नियोजनात्मक हानी होत आहे. महानगराच्या नियोजनबद्ध विकासाच्या उद्देशाला व त्या दृष्टीने केलेल्या नियोजनाचा बट्ट्याबोळ होत आहे. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी व्हावी. त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी विनंतीही आर्दड यांनी पत्रातून केली आहे.

तुकडाबंदीचे व्यवहार बोगस एन-ए द्वारे?तुकडाबंदी नियमानुसार कुठल्याही जमिनीची विना एन-ए मुद्रांक नोंदणी होत नाही. महानगर प्राधिकरणाच्या आराखड्यात जर जमीन ग्रीन झोनमध्ये असेल तर काहीही करता येत नाही; परंतु काही महाभागांनी ग्रीन झोनऐवजी यलो झोन करून बोगस एन-ए तयार केल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये मुद्रांक विभाग, महसूल विभाग, प्राधिकरणातील यंत्रणा सहभागी असल्याचा संशय आहे. चौकशीअंती सगळा प्रकार समोर येऊ शकतो.

विभागीय आयुक्त आर्दड यांना थेट प्रश्न...प्रश्न : आपण अधिकृत असताना चौकशी स्वत: का केली नाही?उत्तर: संचालकांकडून चौकशी झाल्यास वस्तुस्थिती समोर येईल.

प्रश्न : नेमका काय प्रकार घडल्याच्या तक्रारी आहेत?उत्तर : आराखड्यात ग्रीन झोन परस्पर बनावट कागदपत्रांधारे यलो दाखवून तहसीलदारांकडून एन-ए परवानगी घेतली आहे.

प्रश्न : नगररचना विभागाची भूमिका काय आहे?उत्तर : नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी तक्रारींची चौकशी करणे, संबंधितांवर गुन्हे दाखल करणे अपेक्षित आहे.

प्रश्न : संचालकांकडे पत्र देण्याचे कारण काय?उत्तर : स्थानिक यंत्रणा कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नाहीत, म्हणून पत्र दिले.

प्रश्न : या सगळ्या प्रकारामुळे काय नुकसान होत आहे?उत्तर : हे सगळे तज्ज्ञाने हे तपासले पाहिजे. समांतर यंत्रणा तयार करून काहीही साध्य होणार नाही.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग