शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा मिलाफ; माजी अभिनेत्री मयुरी कांगो गूगलमध्ये आहे इंडस्ट्री हेड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 20:05 IST

International Women's Day : अभिनयाच्या माध्यमातून दाखविलेली कला आणि करिअरमध्ये गाठलेल्या उंचीमधून दिसलेली बुद्धिमत्ता अशा मयुरी कांगो म्हणजे कला, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट मिलाफ.

औरंगाबाद : 'घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही...' या गाण्यात जेव्हा ती मोठ्या पडद्यावर दिसली, तेव्हाच खरे तर औरंगाबादकरांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. पण यापेक्षाही मोठे यश तिने मिळविले आणि जागतिक स्तरावर औरंगाबादची पताका फडकावली. गूगलमध्ये इंडस्ट्री हेड असलेल्या मयुरी कांगो यांचा औरंगाबादकरांना अभिमान आहे.

अभिनयाच्या माध्यमातून दाखविलेली कला आणि करिअरमध्ये गाठलेल्या उंचीमधून दिसलेली बुद्धिमत्ता अशा मयुरी कांगो म्हणजे कला, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट मिलाफ. सेंट झेविअर्स, सेंट फ्रान्सिस येथून शालेय शिक्षण आणि देवगिरी महाविद्यालयातून पुढील शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. २००५ साली एमबीए करण्यासाठी न्यूयॉर्कला गेल्या. तिथे त्यांच्या वर्गात देश- विदेशातून आलेल्या प्रत्येकालाच कमित कमी १० वर्षांचा कामाचा अनुभव होता. कामाचा कोणताही अनुभव नसलेल्या मयुरी या एकमेव असल्याने सुरुवातीचे ३ ते ४ महिने खूपच अवघड गेले. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ, हा आत्मविश्वास होता. पण कामाच्या अनुभवाचे करायचे काय, असा प्रश्न पडला. म्हणूनच मग त्यांनी शिक्षण घेत नोकरी करायला सुरुवात केेली.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर न्यूयॉर्क येथील एका अग्रणी ॲडव्हरटायझिंग एजन्सीमध्ये त्या काम करू लागल्या. अवघ्या ८ वर्षातच कंपनीच्या सिनिअर डायरेक्टर झाल्या. अनेक मोठेमोठे प्रोजेक्ट त्यांनी अचूक पद्धतीने हाताळले. करिअरमध्ये एक उंची गाठत मयुरी सध्या गूगलमध्ये इंडस्ट्री हेड म्हणून कार्यरत आहेत.

मिसिंग औरंगाबाद :औरंगाबादमध्ये माझे बालपण खूप छान गेले. सायकलवर, सनीवर आम्ही मित्रमैत्रिणी मिळून खूप फिरायचो. खूप सुरक्षित शहर होते. दौलताबाद, वेरूळ अगदी जवळच असल्याने कायम भटकंती करायचो. तिथले लोक आणि आमची भटकंती खूप मिस करते, असे मयुरी म्हणाल्या.

संधी मिळवावी लागते कोणीही तुमच्या समोर संधी घेऊन उभे राहत नाही. तुम्हाला ती मिळवावी लागते. मिडल मॅनेजमेंटमध्ये आज खूप महिला आहेत. पण वरिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या महिलांची संख्या अजूनही कमी आहे. हे प्रमाण बदलणे मयुरी यांना गरजेचे वाटते.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Aurangabadऔरंगाबाद