शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जगाने वाखाणली या मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरची बिझनेस शैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 19:52 IST

International Women's Day : भारतीयांसाठी जगभरात ओळख निर्माण करून देणारे आणि अतिशय सन्मानाचे असणारे नॉन रेसिडेंट इंडियन ऑफ दी ईअर अवॉर्ड, वूमन लीडरशिप अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन ऑइल ॲण्ड गॅस सेक्टर, स्पेशल ॲलोकेशन ऑफ ए जर्मन एमएनसी स्टॉक अवॉर्ड, असे अनेक महत्त्वपूर्ण अवॉर्ड अंजू यांनी पटकाविले आहेत.

औरंगाबाद : जेएनईसी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेत शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीनिमित्त त्यांनी थेट सिंगापूर गाठले. सिंगापूरच्या मल्टिनॅशनल कंपनीपासून सुरू झालेला अंजू जसवाल यांचा प्रवास आता त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना थेट जगभरात ओळख मिळवून देणारा ठरला आहे.

वडील लष्करी सेवेत वरिष्ठ अधिकारी असल्याने अंजू यांचे शालेय शिक्षण नेहमीच वेगवेगळ्या गावांमध्ये झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण मात्र त्यांनी औरंगाबाद येथून घेतले. सध्या अंजू एका मल्टिनॅशनल कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. याआधी अंजू यांनी एका जर्मन मल्टिनॅशनल कंपनीसाठी रिजनल आणि ग्लोबल हेड, अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. कोणतेही काम एकाग्रता आणि आत्मविश्वासाने करणे ही अंजू यांची वैशिष्ट्ये नेहमीच बिझनेस जगताकडून वाखाणली गेली आहेत. भारतीयांसाठी जगभरात ओळख निर्माण करून देणारे आणि अतिशय सन्मानाचे असणारे नॉन रेसिडेंट इंडियन ऑफ दी ईअर अवॉर्ड, वूमन लीडरशिप अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन ऑइल ॲण्ड गॅस सेक्टर, स्पेशल ॲलोकेशन ऑफ ए जर्मन एमएनसी स्टॉक अवॉर्ड, असे अनेक महत्त्वपूर्ण अवॉर्ड अंजू यांनी पटकाविले आहेत.

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडाकरिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे, सगळ्यात आवश्यक आहे. कारण जेव्हा आव्हाने येतील, तेव्हाच त्यांचा सामना करायलाही शिकाल. तुमच्या गुणवत्ता, कौशल्याला कधीच बंदिस्त करून ठेवू नका. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचा विकास करा आणि परिपूर्ण आयुष्य जगा, असा संदेश अंजू यांनी दिला.

ते गणेश मंदिर अजूनही आठवतेऔरंगाबादच्या असंख्य आठवणी कायमच माझ्या सोबत असतात. आमच्या वेळी असणारे प्राचार्य दाभाडे यांच्यासह अनेक प्राध्यापकांची नेहमीच आठवण येते. आमच्या कॉलेजजवळ एक गणेश मंदिर होते. परीक्षेच्या आधी त्या मंदिरात आम्ही आवर्जून जाऊन यायचो. आजही एखादी परीक्षा आली की, ते गणेश मंदिर हमखास आठवते, अशी आठवण अंजू यांनी सांगितली.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनAurangabadऔरंगाबाद