लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलातील नवीन रुपडे लाभलेले व हिरवा गालिचा असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी आयोजित करण्याच्या हालचाली वेगाने सुरूझाल्या आहेत. हा लोकार्पण सोहळा खा. चंद्रकांत खैरे, मनपाचे पदाधिकारी, संबंधित वॉर्डाचे नगरसेवक, आमदार तसेच महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत होण्याची शक्यता आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आ. अतुल सावे असणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.चार महिन्यांनंतरही आंतरराष्ट्रीय दर्जाचे झालेले गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदान सुरूझाले नव्हते. याविषयी महापौरांनी लोकमतशी बोलताना या दर्जेदार मैदानाचा लोकार्पण सोहळा लवकरच आयोजित केला जाणार असल्याचे संकेत रविवारी दिले होते. त्याचप्रमाणे गरवारे क्रीडा संकुलही मनपाच्या क्रीडा विभागाकडे सुपूर्द केले जाणार असल्याचे सांगितले होते.लोकमतच्या वृत्तानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज गरवारे क्रीडा संकुलातील नव्याने उभारण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान त्वरित क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानाच्या देखभालीचा अनुभव महानगरपालिकेतील कर्मचाºयांना नाही. त्यामुळे याची जबाबदारीही हे मैदान उभारणारे आंतरराष्ट्रीय क्युरेटर नदीम मेमन यांच्यावरच सोपवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. नदीम मेमन यांना मैदानाच्या देखभालीसाठी वर्षाकाठी १५ लाख रुपये देण्यात येणार आहे. गरवारे क्रीडा संकुलावर असणाºया मनपा कर्मचाºयांचा उपयोग दुसºया ठिकाणी करण्यात येणार आहे. इतर खाजगी मैदानांप्रमाणेच येथेही प्रतिदिन १0 हजार रुपये भाडे आकारले जाणार आहेत.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:49 IST
गरवारे क्रीडा संकुलातील नवीन रुपडे लाभलेले व हिरवा गालिचा असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी आयोजित करण्याच्या हालचाली वेगाने सुरूझाल्या आहेत. हा लोकार्पण सोहळा खा. चंद्रकांत खैरे, मनपाचे पदाधिकारी, संबंधित वॉर्डाचे नगरसेवक, आमदार तसेच महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत होण्याची शक्यता आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आ. अतुल सावे असणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मैदानाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी?
ठळक मुद्देमहापौरांचे प्रशासनाला आदेश : क्रीडा विभागाला क्रिकेट मैदान त्वरित हस्तांतरण करानदीम मेमन यांच्यावरच असणार मैदानाच्या देखभालीची जबाबदारी