शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

इमिग्रेशन चेकपोस्टच्या प्रतीक्षेत अडकली छत्रपती संभाजीनगरची आंतरराष्ट्रीय विमानसेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 20:20 IST

महिनाभरापूर्वी ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून पाहणी, अहवालाकडे लक्ष;विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र गेट तयार करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळावर महिनाभरापूर्वी ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या ३ अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. आता या पाहणीच्या अहवालाची विमानतळ प्राधिकरणाला प्रतीक्षा असून, अहवालानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेची दिशा ठरणार आहे.

गृहमंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्टलाही (आयसीपी) मंजुरी मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातून किमान हिवाळ्यात तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

ब्युरो ऑफ इमिग्रेशनच्या ३ अधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला. या सुविधा आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या दृष्टीने योग्य आहेत की नाही, त्यात काही बदल करणे गरजेचे आहे का, या संदर्भात ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून विमानतळाला अहवाल दिला जाईल. अद्यापपर्यंत हा अहवाल आलेला नाही, परंतु काही बदल करावे लागतील, अशी चिन्हे असल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.

बँकाॅक विमानसेवेकडे डोळेएअर एशिया एअरलाइन्सने वर्षभरापूर्वी बँकाॅक विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. मात्र, गृहमंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्टला (आयसीपी) मंजुरी मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरू होते, याकडे विमान प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

विमानतळावर काय सुविधा सज्ज?विमानतळ प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विमानाच्या वाहतुकीसाठी विमानतळात वेगळी व्यवस्था केली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांना प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी वेगवेगळी सुविधा केली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या पासपोर्ट आणि व्हिसा तपासणीसाठी, इमिग्रेशन अधिकाऱ्यांसाठी जागा निश्चित करून देण्यात आली आहे. इमिग्रेशन काउंटर तयार करण्यात आले आहेत. याशिवाय संशयित व्यक्तींची तपासणी किंवा त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी विशेष तपासणी कक्षही तयार करण्यात आले आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ