शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 06:20 IST

भाजपाचे शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीवरून मोठे राजकारण रंगले होते. शहराध्यक्ष पदासाठी किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा संधी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्यामुळे संधी मिळाली नाही.

औरंगाबाद : भाजपाची शहर आणि जिल्हा कार्यकारिणी सहा महिन्यांनंतर जाहीर झाली. या कार्यकारिणीत शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांना टीम करण्यासाठी स्वातंत्र्य न देता वरिष्ठ नेत्यांनी दबाव टाकून स्वत:च्या समर्थकांना कार्यकारिणीवर घेण्यास भाग पाडल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचे पडसाद कार्यकारिणी जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेत उमटले. शहराध्यक्ष संजय केणेकर हेच पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.भाजपाचे शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीवरून मोठे राजकारण रंगले होते. शहराध्यक्ष पदासाठी किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा संधी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्यामुळे संधी मिळाली नाही. यानंतर त्यांनी भाजपाला रामराम करत शिवसेनेला जवळ केले. ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडतानाही विजय औताडे यांच्या नावाला माजी विधानसभाध्यक्ष आ. हरिभाऊ बागडे यांचा विरोध होता. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यामुळे औताडे यांची वर्णी लागली. यानंतर शहर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर करणे अपेक्षित असताना सहा महिन्यांपासून नावांवर एकमत होत नसल्यामुळे जाहीर केली नाही. शहर कार्यकारिणीत सहभागी होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री दानवे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. भागवत कराड, आ. अतुल सावे यांच्या शिफारशी मोठ्या संख्येत आल्याने शहराध्यक्षांना मनाप्रमाणे कार्यकारिणी बनविता आली नसल्याची कुजबूज भाजपच्या कार्यालयात सुरू होती. या सर्व राजकारणामुळे नाराज शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी कार्यकारिणी जाहीर करण्याच्या पत्रकार परिषदेला दांडी मारली. त्याचवेळी शहरातील आ. सावे, शिरीष बोराळकरांसह इतर पदाधिकारीही अनुपस्थित होते. खा. डॉ. कराड यांनीच प्रसिद्धीपत्रक दिले. तसेच मी ग्रामीणचा जिल्हा प्रभारी असल्यामुळे उपस्थित असल्याचे स्पष्ट केले. शहर कार्यकारिणीत उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि चिटणीस या पदांवर केंद्रीय मंत्री दानवे, आ. सावे समर्थकांचीच वर्णी लागल्याचे दिसून येते. भाजपत मागे-पुढे करणाऱ्यांना पदे वाटली जात असल्याची प्रतिक्रिया एका पदाधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण