हिंगोली : उत्पादकांच्या हातातून माल निघून गेल्यानंतर आता सोयाबीनच्या दराने उड्डाण घेतली आहे. सध्या राज्यातील प्रत्येक बाजार समितीत ४ हजारांच्या पुढे सोयाबीनला दर मिळत आहे; परंतु या वाढत्या दरांचा फायदा उत्पादकांना होण्याऐवजी व्यापार्यांच्या घशात जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रात प्रतिवर्षी विक्रमी वाढ होत आहे. यंदाप्रमाणे मागील वर्षी एकूण क्षेत्रापैकी अर्ध्या क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता; परंतु पावसामुळे प्रंचड नुकसान होवून सोयाबीन हातचे निघून गेले होते. उतार्यात मोठी घट झाल्यामुळे उत्पादकांना वाढीव दराची अपेक्षा होती; मात्र हंगाम निघून गेला तरी सोयाबीनच्या दरात वाढ झाली नाही. उत्पादकांच्या हातात माल असेपर्यंत साडेतीन हजारांच्या आत भाव घुटमळला होता. प्रारंभी ३ हजार २०० रूपयांपर्यंत सोयाबीनला कमाल भाव मिळाला होता. आता खरीप हंगामाची पेरणी जवळ आली असताना सोयाबीनच्या दरात वाढ होताना दिसते. मागील पंधरवाड्यापासून सातत्याने दरात वाढ होत आहे. कमी-अधिक प्रमाणात राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दराने ४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. हिंगोली बाजार समिती देखील त्याला अपवाद उरली नाही. १७ मे रोजी मोठी उड्डाण घेत सोयाबीनचा दर साडेचार हजारांच्या घरात गेला. प्रतिदिवशी सोयाबीनच्या दरात वाढ होवू लागल्याने हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक चांगली होत आहे. १७ मे रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ३ हजार ८०० रूपयांपासून लिलाव सुरू झाला. सोयाबीनच्या दर्जानुसार त्यात वाढ होवून ४ हजार ५०० रूपयांपर्यंत कमाल दर गेला; परंतु या वाढीव दराचा फायदा उत्पादाकांऐवजी व्यापार्यांना होताना दिसतो. आर्थिक चणचणीमुळे उत्पादकांनी हंगामातच सोयाबीनला बाजार दाखविला होता. तेव्हा सव्वातीन हजारांच्या पुढे उत्पादकांना दर मिळाला नाही. आता हिंगोलीसह राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये ४ हजारांच्या पुढे मिळणारा भाव व्यापार्यांच्या पथ्यावर पडत आहे. मराठवाड्यातील अंबेजोगाई बाजार समितीत देखील उत्पादकांना किमान ४ हजार ५१ तर कमाल ४ हजार ५१० रूपयांचा दर मिळाला. विदर्भातील अकोला बाजार समितीत सोमवारी कमाल ४ हजार ३७५ तर किमान ४ हजार रूपयांवर दर गेला. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली बाजार समितीत ४ हजार २०० रूपयांपासून सुरू झालेल्या लिलावाने विक्रमी टप्पा ओलांडीत क्विंटलास ४ हजार ८०० रूपयांचा सर्वोच्च भाव उत्पादकांना दिला. जवळपास प्रत्येक बाजार समितीत ४ हजार रूपयांच्या पुढेच दर गेला आहे; पण उत्पादकांच्या हातातून माल निघून गेल्यामुळे वर्षातील वाढलेले दराचे आकडे विक्रम करीत आहेत; परंतु त्याचा फायदा उत्पादकांना नाही. राज्यातील प्रत्येक बाजार समितीत प्रतिक्विंटलास ४ हजारांच्या पुढे मिळत आहे सोयाबीनला भाव. हंगामात उत्पादकांच्या हातात माल असेपर्यंत साडेतीन हजारांच्या आत घुटमळला होता सोयाबीनचा भाव. हंगाम निघून गेला असताना आता सोयाबीनच्या दरात झालेली वाढ उत्पदकांऐवजी व्यापार्यांच्या हिताची दिसून येत आहे. बाजार समित्यांतील दर कृउबा कमाल किमान करंजाळा ४४५०४००० देऊळगाव ३८००२५०० संगमनेर ४३७६४३७६ सांगली ४८००४२०० अकोला ४३७५४००० खामगाव ४३७५४९५० अंबाजोगाई ४५१०४०५१ कोटल ४४५१३७०० बाभूळगाव ४५००३५०० श्रीरामपूर ४४५०४४५० १७ मे रोजी ३ हजार ८०० रूपयांपासून सुरू झालेला लिलाव हा मालाच्या दर्जानुसार वाढत जावून ४ हजार ५०० रूपयांपर्यंत स्थिरावला.
दरवाढ व्यापार्यांच्या हिताची
By admin | Updated: May 21, 2014 00:48 IST