शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवशाही’वर प्रशिक्षित चालक देण्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 17:16 IST

शिवशाही बसवर प्रशिक्षित चालकच पाठविला गेला पाहिजे, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले.

औरंगाबाद :  शिवशाही बस ही नवीन ब्रँड आहे. त्यावर प्रत्येकाचे लक्ष आहे. अपघात झाला तर तात्काळ माहिती मिळत असून, अपघाताचे प्रमाण काहीसे अधिक आहे. असे असले तरी बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. ‘एसटी’सह भाडेतत्त्वावरील शिवशाही बसच्या चालकांनाही प्रशिक्षण बंधनकारक आहे. शिवशाही बसवर प्रशिक्षित चालकच पाठविला गेला पाहिजे, असे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले.

जिल्ह्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेली एसटी महामंडळाची वातानुकूलित शिवशाही बस सोयीसुविधांबरोबर अपघातांमुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांत एकट्या औरंगाबाद विभागातील २२ बसचा अपघात झाला. यात ५ अपघात हे प्राणांतिक होते. एसटी महामंडळाची गुरुवारी मराठवाडास्तरीय त्रैमासिक आढावा बैठक झाली. या बैठकीत ‘एसटी’च्या विविध विषयांबरोबर शिवशाही बसच्या अपघातांच्या मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. शिवशाही बसच्या परिस्थितीविषयी देओल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, शिवशाही बस ही प्रामुख्याने लांब पल्ल्यावर धावते. या बस नवीन आहेत. काही अपघातांत चालकांमुळे ही बस रस्त्यांवरून खाली उतरली. बसच्या तुलनेत अधिक प्रशिक्षित चालक ठेवण्यास प्राधान्य दिले जात आहे. बसची तपासणीदेखील करण्यात आलेली आहे. त्यात कोणताही तांत्रिक दोष आढळून आलेला नाही, असे देओले म्हणाले. 

देओले म्हणाले की, औरंगाबादेत शहर बससेवा सुरू केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित आहे. त्यामुळे ही सेवा सुरू करताना कोणावरही अतिरिक्त भार येणार नाही. शिवाय कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रियादेखील सुरू आहे.

खाजगी चालकांनाही बंधनकारकशिवशाही बसच्या चालकांना प्रशिक्षण दिले आहे. त्याबरोबर आता पुन्हा प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण एखाद्या वर्गापेक्षा प्रत्यक्ष बसमध्ये दिले जात आहे. खाजगी बसचालकांनाही प्रशिक्षण बंधनकारक आहे. बसवर प्रशिक्षित चालकच गेला पाहिजे, यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आगामी कालावधीत अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा देओल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटीAurangabadऔरंगाबाद