शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
7
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
8
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
9
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
10
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
11
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
12
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
14
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
15
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
16
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
17
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
18
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
19
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
20
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
Daily Top 2Weekly Top 5

निष्पाप जीव गेला; १२ तासांनंतर मुकुंदवाडीतील अतिक्रमणांवर महापालिका, पोलिस तुटून पडले

By मुजीब देवणीकर | Updated: June 21, 2025 15:17 IST

मुकुंदवाडी ते चिकलठाण्यापर्यंत ४५० अतिक्रमणे, कारवाईसाठी मुकुंदवाडीला छावणीचे स्वरूप, राजकीय नेते, कार्यकर्त्यांचीही अतिक्रमणे जमीनदोस्त

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडीत गुरुवारी रात्री ८ वाजता किरकोळ वादातून चिकन शॉपमध्ये काम करणाऱ्या मस्तान कुरैशी उर्फ नन्ना याने तीन जणांवर सुऱ्याने सपासप वार केले. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. दोन्ही जखमी सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या हृदयद्रावक घटनेने शहर सुन्न झाले. घटनेच्या अवघ्या १२ तासांनंतर शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता महापालिका आणि पोलिस संयुक्तपणे या भागातील अतिक्रमणांवर तुटून पडले. अवघ्या चार तासांत ८५ लहान-मोठ्या अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांची अतिक्रमणेही जेसीबीने अक्षरश: उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईचे शहरवासीयांनी जोरदार स्वागत केले.

मस्तान कुरैशी उर्फ नन्ना याने केलेल्या हल्यात नितीन सोनाजी संकपाळ (३५, रा. राजनगर, मुकुंदवाडी) यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळीच पोलिस आयुक्तांनी महापालिका प्रशासक यांच्याकडे अतिक्रमणे काढण्याचा आग्रह धरला. मोठा पोलिस बंदोबस्तही देण्याची तयारी दर्शवली. प्रशासक जी. श्रीकांत यांनी अतिक्रमण हटाव विभागाला मुकुंदवाडी ते चिकलठाण्यापर्यंत दोन्ही बाजूंची सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. दुपारी ठीक १२.३० वाजता मुकुंदवाडी स्मशानभूमीच्या बाजूला जिथे नितीन यांची हत्या करण्यात आली. त्या ठिकाणापासून जेसीबीने कारवाईचा बडगा उगारला. सुरुवातीला काही व्यापाऱ्यांना सामानही काढण्याची संधी मिळाली नाही. तिथे अतिक्रमण करून चिकन, मटन, चहा-नाश्ता, गॅरेज, बांबू, चायनिज, बॅटरी विक्रेते, मासोळी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. ती सर्व दुकाने एकानंतर एक अशी जमीनदोस्त केली. एसटी वर्कशॉपसमोरील वेल्डींगसह, लोखंडी कपाट तयार करणारे व अन्य विक्रेत्यांची दुकाने पाडण्यात आली.

पोलिसांसमोर व्यापाऱ्यांची चुप्पीकारवाईपूर्वी मुकुंदवाडीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाचेही कर्मचारी तैनात होते. त्यामुळे कारवाईला व्यापाऱ्यांनी अजिबात विरोध दर्शविला नाही. कारवाई झाल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला.

भाजीमंडई ते सोहम कॉर्नरमुकुंदवाडी भाजीमंडईपासून सोहम मोटर्सच्या कॉर्नरपर्यंतच्या अतिक्रमणांवर दुपारनंतर कारवाई सुरू केली. सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेली चायनीज, चिकन, मटन, चहा-नाश्ता आदी टपऱ्या, शेड जमीनदोस्त केले. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, शेकडो नागरिक याठिकाणी उपस्थित होते.

राजकीय नेत्यांची दुकानेआमदार नारायण कुचे यांचे नातेवाईक, माजी नगरसेवक बाबासाहेब डांगे, मोतीलाल जगताप, सामाजिक कार्यकर्त्या गौराबाई जाटवे, उद्धवसेनेचे शिंदे आदी विविध कार्यकर्त्यांची दुकाने, हॉटेल, बिअर शॉपी तोडण्यात आले.

६० मीटर रुंद रस्ता हवामहापालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रारंभी विकास आराखड्यानुसार रस्ता ६० मीटर रुंद आहे का? याची तपासणी केली. ६० मीटर रुंदीत येणारी अतिक्रमणे लाल पेंटच्या साह्याने मार्क करायला सुरुवात केली. दुभाजकापासून ३० मीटर डावीकडे आणि ३० मीटर उजवीकडे, अशी मोजणी केली. याशिवाय दोन्ही बाजूने ६ मीटर सामासिक अंतर सोडणे प्रत्येक मालमत्ताधारकाला बंनकारक आहे. त्या जागेत बांधकाम, लोखंडी जाळीही उभारता येत नाही. ६० मीटर अंतरात सर्व्हिसरोड, ग्रीन बेल्ड अपेक्षित आहे. शुक्रवारी पाडण्यात आलेली अतिक्रमणे सामासिक अंतर आणि दोन्ही बाजूने ३० मीटरच्या आत होती.

राजकीय हस्तक्षेप नाहीबीड बायपास रोडवर सर्व्हिस रोडसाठी मागील आठवड्यात मनपाने कारवाई केली. त्यावेळेस राजकीय मंडळींनी कारवाई थांबविण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांवर बराच दबाव टाकला होता. शुक्रवारी मुकुंदवाडी भागात कारवाई करीत असताना एकाही राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी दबाव टाकला नसल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.

यापूर्वीच्या कारवाया थातूरमातूरमहापालिकेने मुकुंदवाडीत यापूर्वी दोन ते तीन वेळेस मोठ्या कारवाया केल्या. तेव्हा सामासिक अंतर, ३० मीटरच्या आत असलेली अतिक्रमणे कधीच काढली नाहीत. एवढ्या वर्षांपासून ही अतिक्रमणे होती तर मनपाने का काढली नाही ? अधिकाऱ्यांनी आज पहिल्यांदाच विकास आराखड्यानुसार रस्ता मोजून कारवाई केली. पूर्वी रस्त्याला टेप का लावला नाही ? एवढे दिवस अधिकारी अतिक्रमणांकडे का दुलर्क्ष करीत होते ? असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

अवैध दारूअड्डेमुकुंदवाडी चौकात काही हॉटेल, चायनिज सेंटर हे अनधिकृत दारूचे अड्डेच बनले होते. अनेक ग्राहक दारू सोबत आणून येथे मनसोक्त रिचवत होते. हाकेच्या अंतरावर मुकुंदवाडी पोलिस ठाणे आहे. पोलिसांनीही कधी कारवाईचा बडगा उगारला नाही. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींची या भागात नेहमीच ऊठबस होती. त्याकडेही पोलिसांनी डोळेझाक केली.

वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकूनमनपा प्रशासक जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अतिक्रमण हटाव प्रमुख संतोष वाहुळे, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील हे मुकुंदवाडी ते चिखलठाणा दरम्यान कारवाईत उपस्थित होते.

१० जेसीबी, ८ टिप्परकारवाईसाठी १० जेसीबी, ८ टिपर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाड्याची वाहने होती. कारवाईमध्ये सहायक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव आणि कर्मचारी उपस्थित होते.

तीन मजली, दोन मजली इमारतसोहम मोटर्ससमोरील सर्व्हिसरोडवर हारुण कुरैशी यांची तीन मजली इमारत होती. ही इमारत तब्बल २० फूट पुढे आल्याचे मोजणीनंतर लक्षात आले. नगररचना विभागाचे सहायक नगररचनाकार सुरज सवंडकर, सौरभ साळवे व रामेश्वर सुरासे यांनी मार्किंग करून दिल्याने जेसीबीने पाडापाडी सुरू केली. इमारतीचा दर्शनी भाग पूर्णपणे पाडण्यात आला. इमारतीच्या अंडरग्राउंडमध्ये मटण विक्रीसाठी आणलेल्या शेळ्या, बोकड होते. ही जनावरेही बाहेर काढण्याचे औदार्य मालकाने दाखविले नाही. मनपानेही माणसांना बाहेर काढून कारवाई सुरू केली. त्याला लागूनच अस्लम उर्फ बाबा कुरैशी यांची दोन मजली इमारत आत्ताच बांधलेली आहे. ही इमारतही अर्ध्याहून अधिक पाडली. त्यातील कोंबड्याही मालकाने बाहेर काढल्या नाहीत. दोन्ही इमारत मालकांनी संपूर्ण इमारत पाडण्यासाठी वेळ मागून घेतला. मनपाने तीन दिवस वेळ दिला.

जेसीबीचालक बालंबाल बचावलेबाबा कुरैशी यांची इमारत दोन जेसीबीने पाडण्यात येत होती. एक जेसीबी दर्शनी भागात, तर दुसरा बाजूला होता. इमारत पाडत असताना मोठा स्लॅब गणेश दराडे यांच्या जेसीबीला लागून बाजूला पडला. जेसीबीच्या काचा फुटल्या. मात्र दराडे यांना किंचितही खरचटले नाही. स्लॅब पूर्णपणे जेसीबीवर आदळला असता तर मोठा अनर्थ झाला असता. हे दृष्य पाहणाऱ्या शेकडो जणांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता. कारवाई थांबवत चालक दराडे यांना बाजूला केले. पाणी पाजले. दराडे यांनीही जेसीबीतून उतरताना देवाचे आभार मानले.

संजयनगर भागात मोठी अतिक्रमणेमुकुंदवाडी पोलिस ठाण्यासमोर सर्व्हिसरोड अस्तित्वात आहे. पुढे संजयनगर येथून रस्ता बंद झाला. रामनगर येथे काही ठिकाणी रस्ता दिसतो, पुढे विमानळापर्यंत रस्ता गायब झाला आहे. सायंकाळी सर्व्हिसरोडवरील अतिक्रमणधारकांना स्वत: अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केली. मनपा प्रशासकांच्या आदेशानुसार जालनारोडच्या दोन्ही बाजूंनी असलेली संपूर्ण अतिक्रमणे काढून सर्व्हिसरोड मोकळा करण्यात येईल, असे अतिक्रमण हटाव प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले.

एस. टी. वर्कशॉप ते जिमखानामुकुंदवाडी चौकातील एस. टी. वर्कशॉपसमोर सर्व्हिस रोड आहे. त्याच्या बाजूला बरीच लहान मोठी दुकाने आहेत. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून कारवाई निश्चित केली जाणार असल्याचे वाहुळे यांनी पत्रकारांना सांगितले.

पहिल्यांदाच पोलिस आग्रहीमहापालिकेने शहरातील चार प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी कार्यक्रम आखला. पहिल्या टप्प्यात बीड बायपास रोडवरील अतिक्रमणे काढली. या ठिकाणी एकही दिवस पोलिस बंदोबस्त मिळाला नाही. मनपाने माजी सैनिकांच्या बळावर ही कारवाई केली. मुंकुदवाडीत गुरुवारी झालेल्या हत्याकांडानंतर पोलिस अतिक्रमणे काढण्यासाठी आग्रही होते.

सर्व्हिस रोडचे अंदाजपत्रकविमानतळासमोरील रस्ता खरोखर ६० मीटर रुंद असल्याचे दिसून येते. पुढे हळूहळू अतिक्रमणे झाली. रस्ता अरुंद होत गेला. काही ठिकाणी सर्व्हिस रोडच गायब आहे. या भागात संपूर्ण कारवाई केली जाईल. वॉर्ड अभियंता यांना सर्व्हिस रोडसाठी अंदाजपत्रकही तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लगेचच सर्व्हिस रोडसाठी कामही सुरू केले जाणार आहे. जालना रोड, जळगाव रोड, पैठण रोडवरील अतिक्रमणधारकांनी आजच आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावीत. हे सर्व रस्ते ६० मीटर रुंद आहेत. या ठिकाणीही मनपा कारवाई करणारच आहे. नुकसान झाल्यास मनपा जबाबदार राहणार नाही.- जी. श्रीकांत, मनपा प्रशासक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEnchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका