शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

हैदरबाग रूग्णालय कार्यान्वीत करण्यासाठी पुढाकार

By admin | Updated: December 17, 2015 00:20 IST

नांदेड : महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेले हैदरबाग येथील सुसज्ज रूग्णालय मागील तीन, चार वर्षापासून बंद स्थितीत असून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत हे रूग्णालय कार्यान्वीत करावे,

नांदेड : महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेले हैदरबाग येथील सुसज्ज रूग्णालय मागील तीन, चार वर्षापासून बंद स्थितीत असून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत हे रूग्णालय कार्यान्वीत करावे, अशी मागणी माजी पालकमंत्री आ़ डी़ पी़ सावंत यांनी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याकडे केली़ शहरातील पूर्व दिशेला असलेल्या हैदरबाग हा शहरापासून दूर अंतरावर असून या भागातील लोकसंख्या अंदाजे २ लाख आहे़ या परिसरात गोरगरीब व मुस्लिम समाज मोठ्या संख्येने राहतो़ या भागात कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध नाही़ येथील नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी पायपीठ करावी लागते़ तातडीची आरोग्य सुविधा वेळेच्या आत न मिळाल्यास रूग्णांच्या जीवितास गंभीर धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सध्या शहरापासून जवळपास १० ते १२ कि़ मी़ अंतरावर विष्णूपुरी येथे स्थलांतर झाले आहे़ हैदरबाग व त्यालगत असलेल्या भागाची लोकसंख्या अंदाजे २ लाख आहे़ सन २००८ मध्ये गुरू - त्ता - गद्दी त्रिशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने हैदरबाग येथे ५० खाटांचे भव्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते़ ज्याचे बांधकाम क्षेत्रफळ १ हजार ५३२ चौ़ मी़ असून त्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत़ मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती ५० खाटांचा दवाखाना चालविण्याची नसल्याने अल्पावधीतच या सुसज्ज इमारतीला कुलुप ठोकण्यात आले़ लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेली ही भव्य इमारत सध्या अडगळीला पडली आहे़ या इमारतीच्या काचा, दरवाजे, खिडक्या, फरशी यांची दुरवस्था झाली आहे़ दरम्यान, महापौर शैलजा स्वामी यांनीही यासंदर्भात आरोग्य मंत्र्यांना निवेदन दिले आहे़ (प्रतिनिधी)