शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

धिंड काढलेल्या गुंड तेजाच्या घर, वीज मीटरची माहिती मागवली; अनधिकृत असल्यास कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:32 IST

गुडघ्यावर, मुंडन, धिंड; ‘चार मुलींना मारेन’ म्हणणाऱ्या तेजाचा पोलिसांनी माज उतरवला

छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणीवर गोळीबार करून पोलिसांसमक्ष जामिनावर सुटल्यावर ‘आणखीन चार मुलींना मारेन, त्यात काय एवढे’, अशी धमकी देणारा गुन्हेगार सय्यद फैजल सय्यद एजाज उर्फ तेजा (रा. किलेअर्क) याचा गुन्हे शाखेने बुधवारी चांगलाच माज उतरवला. मंगळवारी केसांमध्ये हात फिरवत ऐटीत चालणाऱ्या तेजाचे बुधवारी मुंंडन करण्यात आले. शहरभर धिंड काढत कॅनॉट प्लेसला अक्षरश: गुडघ्यावर बसवले. सामान्यांसाठी त्रासदायक झालेल्या तेजाला रस्त्यावरून लंगडताना पाहून नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले.

११ ऑगस्ट रोजी तेजा २५ वर्षीय मैत्रिणीसोबत त्याच्या किलेअर्कच्या घरात होता. यावेळी अमली पदार्थांचा तस्कर, कुख्यात गुन्हेगार तालेब चाऊस, त्याचा मेहुणा सोहेल करीम सय्यद ऊर्फ सोनू मनसे, त्याची आई रेश्मा अंजुम सय्यद यांच्या समोर रात्री ९ वाजता त्याने मैत्रिणीवर गोळी झाडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. तेव्हा, तेजा नशेत तर्रर्र होता. पोलिस आल्याचे कळताच त्याची आई, मित्र, काकाच्या कुटुंबाने पोबारा केला. मंगळवारी तेजाला घटनास्थळी नेत असताना माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर त्याने आणखी चार मुलींना मारण्याची धमकी दिली होती.

गुडघ्यावर आला, लंगडत तोंड लपवत होताबुधवारी दुपारी तेजाला पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासमोर हजर करण्यात आले. पवार यांनी त्याचा पाहुणचार केल्यानंतर त्याने हात जोडून माफी मागितली. त्यानंतर सर्वप्रथम पोलिसांनी त्याचे मुंडन केले. बेगमपुऱ्याचे सहायक निरीक्षक सुनिल लहाने, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे, अंमलदार राजेश यदमळ, शाम आडे, बाळू लहरे, नवनाथ खांडेकर, विजय निकम, सोमकांत भालेराव यांच्या पथकाने त्याला बेड्या ठोकून, तो राहत असलेला किलेअर्क परिसर, कॅनॉट प्लेस व बुढ्ढीलेनमध्ये धिंड काढली. यावेळी तो लंगडत तोंड लपवण्याचा प्रयत्न करत होता.

तर घर, वीज मीटची जोडणी तोडणारपोलिसांनी तेजाची सर्व बाजूने काेंडी करणे सुरू केले आहे. महावितरण, महानगरपालिकेला त्याच्या वीज बिल, घराचे नियमन व करासंदर्भात माहिती मागवली आहे. ते अपूर्ण, नियमबाह्य असल्यास त्यावरही कठोर कारवाईसाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गोळीबारासाठी वापरलेले पिस्तुल त्याने राहत असलेल्या वाड्यातील सोफ्यात लपवले होते. उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी ते जप्त केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी