शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

जायकवाडीत पाण्याची आवक वाढली; धरणाची १८ दरवाजे एक फुटाने उघडून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 22:34 IST

बुधवारी सायंकाळी धरणातून २१,९५३ क्युसेक्स क्षमतेने एकूण विसर्ग सुरू होता.

ठळक मुद्देगोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारासंध्याकाळी जलसाठा ९८.७९ % इतका कायम होता.

पैठण : धरणात येणारी आवक अचानक वाढल्याने जायकवाडीचे १८ दरवाजे एक फूटाने वर उचलून आज गोदावरीत होणारा विसर्ग ९४३२ क्युसेक्सने वाढविण्यात आला. बुधवारी सायंकाळी धरणातून २१९५३ क्युसेक्स क्षमतेने एकूण विसर्ग सुरू होता. मोठ्या क्षमतेने गोदावरीत विसर्ग झाल्याने गोदावरीला पूर आला असून गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी धरणाचा जलसाठा ९८.९५% च्या पुढे सरकला होता तर धरणात येणारी आवक वाढत चालली होती. यामुळे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी विसर्ग वाढविण्याच्या सूचना दिल्या यानुसार सकाळी आठ वाजता अर्धाफूटाने सुरू असलेले ८ दरवाजे एक फूटाने करून ४१९२ क्युसेक्सने  विसर्गात वाढ करण्यात आली. विसर्गात वाढ करूनही धरणाच्या पाणीपातळीत घट होत नसल्याने सायंकाळी ७ ते ८ च्या दरम्यान पुन्हा १० दरवाजे एक फूटाने वर उचलण्याचा निर्णय घेऊन विसर्ग ५२४० क्युसेक्नने वाढविण्यात आला. सकाळी धरणाचा जलसाठा ९८.९५%  होता दिवसभरात दोनदा विसर्ग वाढविल्या नंतरही संध्याकाळी जलसाठा ९८.७९ % इतका कायम आहे.

जायकवाडी साठी नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून ३२२८ व अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून ४००० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग सुरू असून जायकवाडी धरणात हे पाणी दाखल होत आहे. बुधवारी धरणाच्या सांडव्यातून १८८६४ क्युसेक्स व जलविद्युत प्रकल्पातून १५८९ क्युसेक्स असा मिळून गोदावरी पात्रात २०४५३ क्युसेक्स विसर्ग सुरू असून डाव्या कालव्यातून ९०० व उजव्या कालव्यातून ६०० क्युसेक्स असा विसर्ग सुरू आहे.

संभाव्य पुरपरिस्थिती टाळण्यासाठी धरणात जल पॉकेट ठेवा.......जायकवाडी धरणाचा जलसाठा ९९% झाला असून मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसाने गेल्या आठवडा भरात धरणातून होणाऱ्या  विसर्गात जायकवाडी प्रशासनास पटापट बदल करावे लागले आहेत. अशातच मुक्त पाणलोट क्षेत्रात ढगफुटी वा मोठा पाऊस झाल्यास धरणातून मोठा विसर्ग करण्या शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसणार आहे. तशी वेळ आल्यास पैठण ते नांदेड या दरम्यान पुरपरिस्थिती ओढावते असा पूर्वानुभव आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी धरणात किमान ३% चे पॉकेट निर्माण करून ठेवावे अशी मागणी जेष्ठ समाजसेवक दिनेश पारीख यांनी केली आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी