शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

जायकवाडी धरणात आवक वाढली; जलसाठा ३८.३५ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 7:26 PM

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर,दारणा व भावली या धरणात  प्रचलन आराखड्या नुसार जितका जलसाठा ठेवता येतो त्यापेक्षा जास्त जलसाठा झाल्याने या धरणातून शुक्रवारी सायंकाळी विसर्ग करण्यात आला.

ठळक मुद्देएकत्रितपणे नांदूर मधमे्श्वर वेअर मधून गोदावरी पात्रात ९६६७ क्युसेक्स क्षमतेने विसर्गगोदावरी नदी वहाती झाली असून शनिवारी पहाटे हे पाणी जायकवाडी धरणात येऊन धडकले.

- संजय जाधव

पैठण : जायकवाडी धरणात शनिवारी पहाटे नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी दाखल झाले. ७६७२ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक नाथसागरात सुरू असून जलसाठा ३८.३५% इतका झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील पाण्याचे यंदा प्रथमच आगमन झाल्याने जायकवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील ज्या धरणात प्रचलन आराखड्यापेक्षा जास्त जलसाठा झाला अशा धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात नाशिकच्या पाण्याची आवक सुरू झाली आहे असे दगडी धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, ईगतपुरी व घोटी वगळता ईतर ठिकाणी  सरासरी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासातही नाशिक जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली नाही. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर,दारणा व भावली या धरणात  प्रचलन आराखड्या नुसार जितका जलसाठा ठेवता येतो त्यापेक्षा जास्त जलसाठा झाल्याने या धरणातून शुक्रवारी सायंकाळी विसर्ग करण्यात आले. शनिवारी सकाळी गंगापूर २०९० क्युसेक्स, दारणा ५५४० क्युसेक्स, भावली २०८ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. या विसर्गाचा एकत्रितपणे नांदूर मधमे्श्वर वेअर मधून गोदावरी पात्रात ९६६७ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरी नदी वहाती झाली असून शनिवारी पहाटे हे पाणी जायकवाडी धरणात येऊन धडकले. शनिवारी सायंकाळी जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५०८.३६ फुट ईतकी होती. धरणात एकूण जलसाठा १५७०.४४८ दलघमी ( ५५.४६ टीएमसी) झाला असून या पैकी उपयुक्त जलसाठा ८३२.६४२ दलघमी (२९.४० टिएमसी) ईतका झाला आहे. दि  १ जून, २०२१ पासून नाथसागराच्या जलसाठ्यात १९४.१०९७ दलघमी ( ६.८ टीएमसी) वाढ नोंदवली गेली असल्याचे धरण अभियंता विजय काकडे, बंडू अंधारे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणांचा  जलसाठाकरंजवण २२.१४%, वाघाड ४७.५२%,ओझरखेड २५.७७%, गंगापूर ७६.९६%, गौतमी ५६.१६%, पालखेड ५५.७६%, कश्यपी ४७.८५%, कडवा ६१.०२%, दारणा ७६.३९%, भावली १००%, मुकणे ४९.२१%, नांदूर मधमे्श्वर वेअर ९६.५०%, भंडारदरा ८२.३९%, निळवंडे ४३.७५%, मुळा ५०%, पुणेगाव ७.२४%, तीसगाव ०.५०%, वालदेवी १००%, आढळा ४३.२८%, मंडोहळ ०००%, वाकी ४०.१२%, भाम ७६.४२%, आळंदी ७०.४७%, व भोजापूर १४.९८% ईतका जलसाठा झाला आहे.

सायंकाळी विसर्ग घटविले...नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आल्याने नाथसागरात येणारी आवक घटत असल्याचे दिसून आले शनिवारी सायंकाळी ६ वा गंगापूर धरणातून २०९० होणारा विसर्ग ५२४ क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आला. दारणातून ५५४० होणारा विसर्ग ३१२० क्युसेक्स व नांदूर मधमे्श्वर मधून गोदावरी पात्रात होणारा ९६६७ विसर्ग ५७७८ क्युसेक्स पर्यंत घटविण्यात आल्याने जायकवाडी धरणात येणारी आवक घटणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे व बंडू अंधारे यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद