मेल्ट्रॉनचे रूपांतरनंतर साथरोग नियंत्रण हॉस्पिटलमध्ये होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:07 AM2021-01-16T04:07:12+5:302021-01-16T04:07:12+5:30

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यातच आता लसही उपलब्ध झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून ...

Infectious disease control will take place in the hospital after the conversion of Meltron | मेल्ट्रॉनचे रूपांतरनंतर साथरोग नियंत्रण हॉस्पिटलमध्ये होणार

मेल्ट्रॉनचे रूपांतरनंतर साथरोग नियंत्रण हॉस्पिटलमध्ये होणार

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यातच आता लसही उपलब्ध झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या मेल्ट्रोन हॉस्पिटलचे नंतर काय करावे, असा प्रश्न महापालिकेला पडला होता. या हॉस्पिटलचे रूपांतर नंतर साथरोग नियंत्रण हॉस्पिटल म्हणून करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्प सल्लागार समिती नेमण्यात येणार आहे.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील मेल्ट्रॉन कंपनीच्या बंद असलेल्या इमारतीमध्ये डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरची क्षमता तीनशे खाटांची आहे. कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असताना महापालिकेला व शहरवासीयांना या केअर सेंटरची मोठी मदत झाली. येणाऱ्या काही महिन्यांत शहर कोरोनामुक्त होईल असा अंदाज आहे. मेल्ट्रॉनच्या कोविड केअर सेंटरचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. या ठिकाणी साथरोग नियंत्रण हॉस्पिटल सुरू करण्याची कल्पना पुढे आली, त्याला देखील पालकमंत्र्यांनी समर्थन दिले. साथरोग नियंत्रण हॉस्पिटल कसे असावे, कोण-कोणत्या सुविधा या ठिकाणी असाव्यात, डॉक्टर्स – वैद्यकीय कर्मचारी किती असावेत, हॉस्पिटल चालविण्यासाठी खर्च किती येईल, याबद्दलचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाणार आहे. त्यासाठी पीएमसी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निविदा काढून पीएमसी नियुक्त केली जाईल. पीएमसीने तयार केलेला अहवाल शासनाला पाठवून पुढील कार्यवाही सुरू केली जाणार आहे.

Web Title: Infectious disease control will take place in the hospital after the conversion of Meltron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.