शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सुट्या तेलाचे जुन्याच डब्यात पॅकिंगचा जुन्या मोंढ्यात ‘उद्योग’, मोठा साठा जप्त

By साहेबराव हिवराळे | Updated: October 23, 2023 13:48 IST

छत्रपती संभाजीनगरात एफडीएची सलग तिसरी कारवाई 

छत्रपती संभाजीनगर : दोन दिवस मोठ्या प्रमाणावर बर्फी जप्त केल्यावर अन्न व औषध प्रशासनाने रविवारी तिसरी मोठी कारवाई जुन्या मोंढ्यात केली. सुटे खाद्यतेल जुन्याच डब्यात पॅकिंग केलेला साडेअठराशे किलोचा साठा छापा टाकून पथकाने जप्त केला.एफडीएने सदर दुकानाला सील ठोकले असून, पुढील कारवाईपर्यंत ते बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

जुन्या मोंढ्यात महेश संजय खोंडे यांच्या बालाजी ट्रेडिंगमध्ये खाद्यतेलाचे रिपॅकिंग करण्याचे काम सुरू होते. अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त अजित मैत्रे यांच्या उपस्थितीत अन्न निरीक्षक निखिल कुलकर्णी यांनी मिळालेल्या माहितीवरून धाड टाकली असता सुटे तेल वापरलेल्या जुन्या डब्यात टाकून त्यास लेबल चिकटविण्याचे काम सुरू होते. चौकशी केली असता कोणताही परवाना संबंधितांकडे नव्हता. तेल तपासणीचा अहवालदेखील नव्हता. सूर्यफूल १४९८.४ कि.ग्रॅ. आणि सोयाबीन तेल ३४३.४ कि.ग्रॅ. असा १,८४१ किलोंचा साठा (किंमत १७५,६८८ रु.) एफडीएने जप्त केला.

नमुने प्रयोगशाळेकडे...दोन्ही तेलांत भेसळ आहे का, हे तपासण्यासाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. सदरील तपासणीचा अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये, हाच या कारवाईमागील हेतू आहे. जनतेनेही गुणवत्ता पाहूनच खरेदी करावी, असे एफडीएच्या पथकाने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागAurangabadऔरंगाबाद