शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

विजेअभावी उद्योग ठप्प; उत्पादनात २५ टक्क्यांची घट, कोट्यवधींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:09 IST

उद्योजकांचा महावितरणविरुद्ध संताप

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात सलग दोन दिवस वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. विजेअभावी दुसऱ्या पाळीतील कामगारांना हातावर हात ठेवून बसावे लागले, तर तिसऱ्या पाळीतील उत्पादन पूर्णतः ठप्प झाले. यामुळे सुमारे २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली आहे. दरम्यान, हे नुकसान कसे भरून काढायचे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

महावितरणकडून दरवर्षी मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. एवढेच नव्हे तर दर शुक्रवारी दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. असे असताना पावसाच्या सरी कोसळताच वीजपुरवठा खंडित होतो, हा अनुभव शहरवासीय आणि उद्योगजगत घेत आहेत. गेल्या काही दिवसांत शहरात वादळवाऱ्यासह पाऊस पडला. या वादळी पावसात वीज यंत्रणा कोलमडून पडली. चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतींमध्येही रोज किमान ४ तास वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती ‘सीएमआयए’चे माजी अध्यक्ष दुष्यंत पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरात आता नवीन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम येथील उद्योगनगरी करीत आहे. मात्र, महावितरणचा कारभार त्या दर्जाचा नाही, या शब्दात पाटील यांनी नाराजी व्यक्त केली, तर ‘मसिआ’चे माजी अध्यक्ष चेतन राऊत यांनी पाऊस अथवा वादळ येताच वीज खंडित होते. त्यामुळे वाळूज आणि चिकलठाणा एमआयडीसीतील उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, असे सांगितले.

वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरूमान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे महावितरणने न केल्यामुळे गुरुवारी वाळूज येथे वीजपुरवठा खंडित झाला. आमच्या दुसऱ्या शिफ्टला कामावर आलेल्या कामगारांना बसून राहावे लागते, तर तिसऱ्या शिफ्टचे काम करताच आले नाही. एमआयडीसीतील अनेक उद्योगांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पहाटे ५ वाजेपर्यंत सुरळीत करण्यात आला. यात उद्योजकांचे मोठे नुकसान झाले.- अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ.

वेळेत ऑर्डर देता येत नाहीमहावितरणच्या गलथान कारभारामुळे उद्योग जगताला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे हा उद्योजकांचा हक्क आहे. मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे न झाल्याने अनेक झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्या. वीज नसल्याने ग्राहकांकडे ऑर्डर वेळेत पोहोचवता येत नाही.-- दुष्यंत पाटील, माजी अध्यक्ष, सीएमआयए.

टॅग्स :MIDCएमआयडीसीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरelectricityवीज