शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या नावावर इंदौर ‘टूर’; १३१ दिवस उलटले तरीही मनपाकडून ठोस उपाययोजना नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 16:12 IST

कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिका अधिकारी, पदाधिकारी ४ जुलै रोजी चकचकीत इंदौर शहराची पाहणी करणार आहेत. कचऱ्याच्या नावावर आता ही ‘टूर’ निघणार आहे. 

ठळक मुद्दे शहरातील कचराकोंडीला १३१ दिवस म्हणजेच चार महिने झाले तरी महापालिकेने ठोस अशा कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत.

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला १३१ दिवस म्हणजेच चार महिने झाले तरी महापालिकेने ठोस अशा कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत. आता कचराकोंडी फोडण्यासाठी महापालिका अधिकारी, पदाधिकारी ४ जुलै रोजी चकचकीत इंदौर शहराची पाहणी करणार आहेत. कचऱ्याच्या नावावर आता ही ‘टूर’ निघणार आहे. 

नारेगाव डेपोमध्ये कचरा टाकण्यासाठी मांडकी, गोपाळपूर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी विरोध केल्यापासून म्हणजे १६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी आहे. मिटमिटा येथे कचरा टाकण्यावरून दंगलही झाली. अनेक नागरिक जखमी झाले. कचरा प्रश्नासंदर्भात नगरसेवकांनी घसा कोरडा होईपर्यंत ओरड केली. एक महापालिका आणि एक पोलीस आयुक्त यांची बदलीही झाली; मात्र कचराकोंडी फोडण्यात मनपा प्रशासनाला अद्याप यश मिळाले नाही. आता मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी इंदौर शहर पाहण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, सभागृहनेता विकास जैन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी चीनसह देशभरातील अनेक शहरांमधील घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली आहे; मात्र त्याचा महापालिकेला काहीही फायदा झालेला नाही.

इंदौरचे वैशिष्ट्य काय?औरंगाबाद शहर आज जेवढे अस्वच्छ आहे; त्यापेक्षा कितीतरी अधिक इंदौर शहर अस्वच्छ होते. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत या शहराने गरुडझेप घेतली. अवघ्या एका वर्षात शहराचा कायापालट झाला. स्वच्छ भारत अभियानात मागील वर्षी आणि यंदाही देशात प्रथम येण्याचा मान या शहराने पटकावला. खाजगी अभिकर्त्यामार्फत सकाळ-संध्याकाळ प्रत्येक मालमत्ताधारकाकडून कचरा जमा करण्यात येतो. यासाठी काही ठराविक शुल्कही नागरिकांकडून घेण्यात येते. वॉर्डनिहाय जमा झालेला कचरा नेणे, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येते.  

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद