शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संशोधन केंद्रांसाठी महाविद्यालयांच्या उदासीनतेमुळे पीएचडी मार्गदर्शकांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 15:33 IST

यूजीसीच्या नियमानुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम असावा व त्याठिकाणी हे अभ्यासक्रम शिकविणारे दोन मान्यताप्राप्त शिक्षक असावेत.

ठळक मुद्देअवघ्या ६२ महाविद्यालयांमध्ये केंद्रविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ४५३ संलग्नित महाविद्यालये आहेत.

औरंगाबाद : यापुढे संशोधन केंद्र असल्याशिवाय महाविद्यालयातील संशोधक मार्गदर्शक शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना संशोधनाचे कार्य करता येणार नाही, यूजीसीच्या या मार्गदर्शक सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालयांकडून अर्ज मागविले होते. मात्र, महाविद्यालयांकडून विद्यापीठाच्या या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

यूजीसीच्या निकषानुसार संलग्नित महाविद्यालयांपैकी अवघ्या ६२ महाविद्यालयांमध्ये संशोधन केंद्र सुरू करण्यास विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ४५३ संलग्नित महाविद्यालये आहेत. यूजीसीच्या नियमानुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम असावा व त्याठिकाणी हे अभ्यासक्रम शिकविणारे दोन मान्यताप्राप्त शिक्षक असावेत. दोन संशोधक मार्गदर्शक, प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, दोन संशोधन सहायक कार्यरत असले पाहिजेत, अशीच महाविद्यालये संशोधन केंद्र सुरू करू शकतात. यासाठी यूजीसीने ३० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांकडे अर्ज करण्याची महाविद्यालयांना मुदत दिली होती. मात्र, विद्यापीठाने १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलेली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ठराव घेऊन संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालये वर्षभर कधीही अर्ज करू शकतील, असा अध्यादेश जारी केला. मात्र, महाविद्यालयांकडून अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

संशोधनासाठी विद्यार्थी क्षमतामहाविद्यालयीन संशोधन केंद्रांमध्ये संशोधनासाठी विज्ञान अभ्यासक्रमासाठी १० विद्यार्थी, सामाजिकशास्त्रे अभ्यासक्रमासाठी २० आणि विद्यापीठातील संशोधन केंद्रामध्ये ५० विद्यार्थी क्षमता निश्चित करण्यात आलेली आहे. संशोधन केंद्र असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये कार्यरत मार्गदर्शक शिक्षकांकडेच विद्यार्थ्यांना संशोधन कार्य करता येईल, या यूजीसीच्या मार्दर्शक सूचनेनुसार विद्यापीठातील अनेक मार्गदर्शक शिक्षकांची चिंता वाढली आहे. यासंदर्भात प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, व्यवस्थापन परिषदेने प्रकुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती. नुकतीच झालेल्या उपसमितीच्या बैठकीत काही शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात कुलगुरूंसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी