शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला व्यावसायिकासोबत दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान प्रवासात अश्लील कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 19:35 IST

संतप्त महिलेने विमानतळावर पोहोचताच डायल ११२ ला संपर्क करून पोलिसांना बोलावून घेतले

छत्रपती संभाजीनगर : महिला व्यावसायिकासोबत विमानात सहप्रवाशाने अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर प्रवासादरम्यान २ सप्टेंबर रोजी इंडिगोच्या सायंकाळच्या विमानात हा प्रकार घडला. याप्रकरणी आसीफ खान अन्वर अहमद (३९, रा. कटकट गेट) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

५५ वर्षीय तक्रारदार महिला शहरातील नामांकित व्यावसायिक आहे. कामानिमित्त त्या दिल्लीला गेल्या होत्या. सहकाऱ्यांसोबत सोमवारी शहरात येण्यासाठी निघाल्या. दुपारी ४:४५ वाजता दिल्ली विमानतळावरून इंडिगो विमानाने उड्डाण घेतले. त्यांच्या मागच्या सीटवर आसीफ कंपनीच्या सहकाऱ्यांसोबत प्रवास करत होता. प्रवास सुरू होताच आसीफचा महिलेला स्पर्श झाला. सुरुवातीला चुकून स्पर्श झाल्याचे समजून महिलेने दुर्लक्ष केले. मात्र, छत्रपती संभाजीनगरात विमान उतरण्याच्या काही मिनिटे आधी पुन्हा सीटच्या पाठीमागून हात घालून त्याने स्पर्श केला. सातत्याने हा प्रकार घडत असल्याने महिलेने विमानातच आक्षेप घेत त्याला जाब विचारला.

विमानतळावर पोलिसांना बोलावलेसंतप्त महिलेने विमानतळावर पोहोचताच डायल ११२ ला संपर्क केला. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी तत्काळ पथकाला पाठवले. महिलेने सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी आसीफला ताब्यात घेत ठाण्यात नेले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून आसीफला नोटीस बजावून सोडले. मूळ दिल्लीच्या जाफराबाद परिसरातील आसीफ नामांकित कंपनीत व्यवस्थापक आहे. शहरात कटकट गेट परिसरातील बारी कॉलनीत वास्तव्यास आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळCrime Newsगुन्हेगारी