शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलव्हॅनमध्ये विकृत कृत्य, चिमुकल्या तिघींशी रिक्षाचालकाचे अश्लील चाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 13:33 IST

पालकांनी पकडले, जमावाने चोप देत केले पोलिसांच्या ताब्यात 

औरंगाबाद : दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकाने स्कूलव्हॅनमध्ये तीन चिमुरड्या मुलींशी अश्लील चाळे केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. घाबरलेल्या मुलींनी घरी आल्यानंतर हा प्रकार आईला सांगितला. त्यावरून पालकांनी सोमवारी (दि. १२) परिसरातील वाहनतळाजवळ दबा धरून विकृत रिक्षाचालकास पकडले. जमलेल्या नागरिकांनी रिक्षा व व्हॅनचालकास चोप देऊन सिडको पोलिसांच्या हवाली केले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

रिक्षाचालक विकास विठ्ठलराव बनकर (३८, रा. ग. नं. १०, आंबेडकरनगर), व्हॅनचालक राजू मोहन रूपेकर (रा. पिसादेवी) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादीनुसार सिडको, एन ९ परिसरातील एका नामांकित शाळेतील या मुली असून, तिघींपैकी एक मुलगी पहिलीत, तर दोन मुली दुसरीत आहेत. पिसादेवी परिसरातून एका व्हॅनने त्या दररोज शाळेत येतात व जातात. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी दुसरीतील एक मुलगी घरी गेल्यानंतर तिच्या आईला प्रचंड घाबरलेली दिसली. आईने विचारपूस केल्यानंतर तिने व्हॅनचालक आम्हाला गाडीत बसवून तो तेथून निघून जातो. त्यानंतर व्हॅनमध्ये घाणेरडा रिक्षाचालक बनकर आमच्या बाजूला येऊन बसतो, असे सांगितले.

पहिल्या दिवशी मुलीच्या आईने घडलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. १० डिसेंबर रोजी मुलगी घरी आल्यानंतर आईला पुन्हा घाबरलेली दिसली. आईने तिला विचारल्यानंतर तिने त्या घाणेरड्या माणसाने माझ्या दोन मैत्रिणींसोबत काय केले ते सांगितले. त्यामुळे हादरलेल्या मुलीच्या आईने इतर दोन मुलींच्या आईची भेट घेतली. त्या मुलींनीही आईला घटना सांगितली होती. त्यामुळे १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दोन मुलींचे पालक शाळेच्या परिसरात दबा धरून बसले. तेथे व्हॅनचालक रूपेकरने रिक्षाचालक बनकरला इशारा करून तो निघून गेला. त्यानंतर व्हॅनमध्ये बनकर आला. तेव्हा मुली आतमध्ये बसलेल्या होत्या. मुलींकडे जाण्याच्या तयारीत असतानाच पालक तेथे आले. त्यांनी आरोपी बनकरला विचारपूस केली असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. जमावाने बनकरसह रूपेकरला बेदम चोप दिला. घटनेची माहिती समजताच, सिडको ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे हे फाैजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. अधिक तपास सपोनि.श्रद्धा वायदंडे करीत आहेत.

दोन दिवसांची पोलिस कोठडीआरोपी विकास बनकर व राजू रूपेकर यांना तपास अधिकारी यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले, तेव्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. दोन्ही आरोपींची वाहने जप्त करणे, आणखी काही मुलींसोबत असाच प्रकार केला का तपासणे, दोघांमध्ये संगनमत कसे होते, याचा तपास करायचा असल्याची बाजू सरकारी पक्षाने मांडली.

चहापानासाठी देत होता पैसेरिक्षा चालक विकास बनकर हा व्हॅन चालक राजू रूपेकर यास चहापानासाठी देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बनकरला मुलींसोबत अश्लील कृत्य करता यावे, यासाठी मुली गाडीत बसल्यानंतर शाळेच्या पाठीमागे व्हॅन घेऊन जात होता. त्यानंतर, बनकरला इशारा करून बोलवत असे, तसेच स्वत: तेथून निघून गेल्यानंतर बनकर व्हॅनमध्येच मुलींसोबत अश्लील चाळे करायचा.

तिन्ही मुलींना धमकावलेआरोपी बनकर याने मुलींना अश्लील कृत्य केल्यानंतर, घरी पालकांना सांगितल्यास तुम्ही शाळेजवळ बिर्याणी खातात, शाळेमागच्या नाल्यात हातपाय धुतात, असे तुमच्या घरी सांगेल, असे म्हणत धमकावल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

एका आरोपीला पत्नीने सोडलेआरोपी विकास बनकर या १२ वर्षांचा मुलगा त्याच शाळेत शिकतो. त्या मुलाला ने-आण करण्यासाठी रिक्षा घेऊनच तो येत होता. त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वीच त्याला सोडून गेलेली आहे. तिने जाताना मोठा मुलगा सोबत नेला होता. तो तिच्याकडेच राहतो. लहान मुलगा बनकरसोबत असतो.

रूपेकर दाेन मुलींचा बापव्हॅन चालक आरोपी राजू रूपेकर हा दोन मुलींचा बाप आहे. एका मुलीचे लग्न झाले असून, दुसरी मुलगी त्याच्यासोबत राहते. दोन मुलींचा बाप असलेल्या रूपेकरने दुसऱ्यांच्या मुलींना विकृत रिक्षा चालक विकासच्या हवाली केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अटक केल्यावर त्याला उपरती झाली असून, साहेब, माझी चूक झाली, असे म्हणून कबुली देत आहे. बनकर मात्र, तोंड उघडत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी