शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळी घरफोड्या, सोनसाखळी चोरींच्या घटनांत वाढ; गावाला जाताय ? हे अवश्य पाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:20 IST

एन-३ मधून ७ तोळे सोने, १३२० ग्रॅम चांदीच्या मूर्ती चोरीला, साताऱ्यात घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर : ऐन दिवाळीत शहरात चोर, लुटारूंचा वावर वाढला आहे. २४ तासांत एन-३, सातारा परिसरात घरे फोडून लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेण्यात आली, तर सोनसाखळी चोराने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या गळ्यातील १६ ग्रॅमचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. यामुळे सण, उत्सवात बाहेरगावी जाताना व खरेदीसाठी गर्दीत फिरताना दक्ष राहणे गरजेचे झाले आहे.

वडिलांची प्रकृती बिघडल्याने प्रियंका कुरेकर (एन-३, सिडको ) या आईसह त्यांना भेटण्यासाठी दि. ११ रोजी सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून ठाण्याला गेल्या होत्या. १५ ऑक्टोबर रोजी त्यांची कार स्वच्छ करणारे अजीम यांना त्यांच्या हॉलमधील लाइट सुरू असल्याचे आढळले. ही बाब त्यांनी प्रियंका यांच्या आईला कळवली. कुरेकर यांनी तत्काळ माजी नगरसेवक प्रमोद राठोड यांना ही बाब कळवून मदत मागितली. राठोड यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी यांना ही बाब कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

चोरांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. लोखंडी कपाट फोडून त्यातील जवळपास ७ तोळे सोन्याचे दागिने, १३२० ग्रॅमच्या गणपती मूर्ती, समई, ८ हजार रोख रक्कम लंपास केली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआरदेखील नेले. उपनिरीक्षक सुनील म्हस्के अधिक तपास करत आहेत.

सोनसाखळी चोरांचा सणात वावर वाढलाएन-७ मध्ये राहणाऱ्या अनिता प्रकाश ढगे (४९) या दि. १६ रोजी दुपारी १२:३० वाजता बजरंग चौकाकडून पोस्ट ऑफिसच्या दिशेने पायी जात होत्या. यादरम्यान विनाक्रमांकाच्या दुचाकीस्वारांपैकी मागे बसलेल्याने त्यांना 'येथे पीजी हॉस्टेल कुठे आहे' असे विचारले. ढगे यांनी त्याला माहिती नाही, असे सांगत असतानाच त्याने त्यांचे १६.८ ग्रॅमचे सोन्याचे गंठण हिसकावून सुसाट पोबारा केला. सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेशवेनगरात घरफोडीसिंचन विभागातून सेवानिवृत्त झालेले चंद्रकांत सोनार (६३) हे कुटुुंबासह साताऱ्यातील पेशवेनगरमध्ये राहतात. ४ ऑक्टोबर रोजी ते गावाला गेले होते. १४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरी झाल्याचे समजले. ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, ८ ग्रॅमची सोनसाखळी, ५०० ग्रॅम चांदीचे निरंजन, ५ हजार रुपये रोख लंपास केले. सातारा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

गावाला जाताय ? हे अवश्य पाळा-दिवाळीदरम्यान अनेक जण मूळ गावी जातात. मात्र, यादरम्यान घरात मौल्यवान ऐवज ठेवू नका. प्रवासातदेखील नेताना बसमध्ये काळजी घ्या.-गावाला जाण्यापूर्वी एखाद्या विश्वासू, शेजाऱ्याला घरात झोपण्यास सांगा.-दरवाजाचे कुलूप आणि खिडक्या व्यवस्थित बंद करा. शक्य असल्यास मजबूत लॅच लॉक लावा. चोर कुलपाऐवजी मुख्यत्वे कडीकोंडा तोडतात.-अपार्टमेंटच्या रहिवाशांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. सुरक्षारक्षक तैनात करावा.-वृत्तपत्र, दूध घराबाहेर पडून राहणार नाही, याची काळजी घ्या.-फिरण्यासाठी जात असाल तर दागिने, मौल्यवान ऐवज बँक तिजोरीत ठेवून जा.

English
हिंदी सारांश
Web Title : Diwali Crime Surge: Burglaries and Chain Snatching Increase; Travel Safety Tips

Web Summary : During Diwali, Aurangabad sees a rise in burglaries and chain snatching. Homes were looted, and a gold chain was stolen. Police advise precautions: secure homes, inform neighbors, and avoid displaying valuables while traveling.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर