शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अपुरी विमानसेवा, अजिंठा रोडची दुरवस्था, छत्रपती संभाजीनगरात पर्यटक वाढणार कसे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 19:30 IST

राष्ट्रीय परिषदेतून टुरिस्ट गाइड फेडरेशन वेधणार सरकारचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : पर्यटननगरीछत्रपती संभाजीनगरात १९ वर्षांनंतर टुरिस्ट गाइड फेडरेशन ऑफ इंडियाची ९ ते ११ जुलैदरम्यान २६ वी राष्ट्रीय परिषद होत आहे. अपुरी विमानसेवा, अजिंठा रोडची दुरवस्था, टुरिस्ट गाइडची कमतरता यांसह पर्यटकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे या परिषदेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.

पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरात रोज देश-विदेशातील पर्यटक दाखल होतात. परंतु, या पर्यटकांना पर्यटननगरी दाखविणार कोण, असा प्रश्न टूर व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४३ गाइड आहेत. मात्र, प्रत्यक्षात अवघे २० ते २७ जण पर्यटकांना सेवा देत असल्याची परिस्थिती आहे. गाइडची संख्या वाढण्यासाठी विशेष प्रशिक्षण बॅचेस सुरू होतील, परदेशी भाषांचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे टुरिस्ट गाइड फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष डाॅ. सुभाष जाधव यांनी सांगितले.

विमानसेवेची कनेक्टिव्हिटी वाढावीछत्रपती संभाजीनगरातून देशांतर्गत विमानसेवा वाढावी, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी केली जाणार आहे. बौद्ध देशांना प्राधान्याने विमानसेवा सुरू करण्याकडे लक्ष वेधले जाईल.

जयपूर-उदयपूर विमानसेवाजयपूर-उदयपूरसाठी पुन्हा विमानसेवा सुरू झाली पाहिजे. यातून पर्यटननगरीत देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढीस हातभार लागेल, असे सांगण्यात आले.

अजिंठा रोड जलदगतीने पूर्ण कराअजिंठा रोडची जागोजागी दुरवस्था आहे. पर्यटकांना त्याचा त्रास होतो. या रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी टुरिस्ट गाइड फेडरेशन ऑफ इंडिया या अधिवेशनातून करणार आहे.

सरकारकडे याही मागण्या- दक्षिण भारताशी रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविणे.- पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करणे.- अजिंठा-वेरुळदरम्यान शटल सेवा सुरू करणे.- अजिंठा लेणी येथे पर्यटकांची तिकिटासाठी लागणाऱ्या रांगा कमी करण्यासाठी खिडक्यांची संख्या वाढविणे.- उच्च-मूल्याच्या तिकिटधारकांसाठी प्राथमिकता प्रवेश व्यवस्था लागू करणे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटन