शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर २६ चेकपोस्ट; संयुक्त नाकेबंदीतून प्रशासनाची करडी नजर

By विकास राऊत | Updated: March 29, 2024 17:48 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सीमालगत इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या २६ चेकपोस्टवर विविध विभागांची करडी नजर राहणार आहे. मद्य, हवाला रक्कम, तडीपारांच्याबाबत सतर्कतेच्या सूचना देत पोलिस, वनविभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

निवडणूक काळात सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये संयुक्त नाकाबंदी करून आचारसंहिता, कायदा सुव्यवस्थेसंदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी ऑनलाइन बैठक झाली. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जळगाव जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, जालना डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नाशिक जलज शर्मा, बीड दीपा मुधोळ, अहिल्यानगरचे सिद्धाराम सालीमठ, बुलडाणा डॉ. किरण पाटील, धाराशिवचे डॉ. सचिव ओंबासे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक, तालुक्यांचे तहसीलदार बैठकीला हजर होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालगत जालना, जळगाव, धाराशिव, बीड, बुलडाणा, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांमधील निवडणूक टप्पे व त्या अनुषंगाने करावयाचा सुरक्षा व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

निवडणूक आयोगाचे निर्देश असे....जिल्ह्यांच्या सीमा क्षेत्रात नाकाबंदी करणे, मद्य वाहतूक, प्रतिबंधात्मक कारवाई केलेले, तडीपार केलेल्या गुन्हेगारांची माहिती आदानप्रदान करणे, मतदारांच्या दुबार नोंदणीची तपासणी करणे, टपाली मतदानाबाबत आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार बैठकीत आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यातील नाकेबंदी अशी...छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात येणार आहे. त्यात पोलिस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क या व इतर यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी असतील. वन क्षेत्र हद्दीत वन विभागाचे अधिकाऱ्यांचे चेकपोस्ट असतील.

कडक तपासणीच्या सूचना सर्व नाक्यांवर नजर ठेवणे, मद्य वाहतूक विशेषतः मद्यविक्री बंद काळात कडक तपासणी होईल. संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४