शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

पावसात भटकंतीसाठी खास ‘युज ॲण्ड थ्रो रेनकोट’ बाजारात, किंमतही आहे फारच कमी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 17, 2023 20:11 IST

एकदा वापरलेले रेनकोट नंतर कचराकुंडीत दिसले, तर नवल वाटायला नको.

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात अनेकजण निसर्गरम्य परिसरात भटकंती करतात. सहलीत पाठीवर जास्त ओझे नको असते. त्यासाठी वजनाने हलका रेनकोट तर लागतो, पण नंतर तो सांभाळणे ‘जड’ वाटायला लागते. यावर उपाय म्हणजे बाजारात ‘यूज ॲण्ड थ्रो’ रेनकोट आले आहेत. एकदा घाला व फेकून द्या. केवळ प्रवासासाठीच नाही, तर पावसाळ्यात वापरायलादेखील हे स्वस्त अन् मस्त रेनकोट पर्याय ठरू शकतात.

कसे आहेत यूज अँड थ्रो रेनकोट

हे रेनकोट चक्क कोरोना काळातील पीपीटी कीटसदृश्यच आहेत. मुलायम व पातळ प्लास्टिक वापरून हे कोट तयार केलेले आहेत. या रेनकोटच्या किमतीही फार नाहीत. अवघ्या ३० रुपयांपासून हे रेनकोट बाजारात मिळत आहेत. एकदा वापरलेले रेनकोट नंतर कचराकुंडीत दिसले, तर नवल वाटायला नको.

होलसेल ते किरकोळसाठी लगीनघाईयंदा मान्सूनआधीच रेनकोट-छत्र्या बाजारात आल्या असून, होलसेल ते किरकोळ विक्रेत्यांची ‘लगीनघाई’ सुरू झाली आहे. मागीलवर्षी रेनकोटचा स्टॉक पूर्ण संपला होता. यामुळे यंदा रेनकोट जास्त प्रमाणात मागविले जात आहेत. शहरात हंगामात तीन टप्प्यात रेनकोट मागविले जातात.

बाजारातून ‘चायना रेनकोट’ गायबकल्पकता, नावीन्यतेच्या जोरावर मागील २० वर्षे भारतीय बाजारपेठेवर ‘चायना मेड’ वस्तूंनी निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. मात्र, या वस्तू सर्वसामान्यांच्या मनातून उतरू लागल्या आहेत. कारण, कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहक गॅरंटी मागतात. मात्र, ‘चले तो चाॅंद तक, वरना शाम तक’ अशी ‘चिनी’ वस्तूंची अवस्था होती. कोरोना काळानंतर चिनी वस्तू मागविणे कमी केले. यंदा तर ‘मेड इन चायना’ बाजारातून गायब झाले आहे. टिकावू, गुणवत्तापूर्ण रेनकोट, छत्र्यांचाच सर्वत्र बोलबाला आहे.

कुठून आले -रेनकोट : मुंबई, कोलकाता, दिल्ली.छत्री : मुंबई, कोलकाता

किमती कितीरेनकोट : १९० ते २२०० रु. यूज ॲण्ड थ्रो रेनकोट : ३० ते १७५ रुपयेछत्री : १६० ते ३५० रुपये

किती किमतीचा पहिला लॉट बाजारात दाखलरेनकोट : ३ कोटी ५० लाखछत्री : ८० लाख

महिलांसाठी : दुचाकी चालविणाऱ्या महिलांसाठी कट रेनकोट आला आहे.विद्यार्थ्यांसाठी : दप्तरही झाकून जाईल, असे मोठ्या आकारातील रेनकोट मिळत आहेत.

छत्रीपेक्षा रेनकोट खरेदीचे प्रमाण अधिकबहुतांश लोक दुचाकी वापरतात. त्यामुळे रेनकोट खरेदीदारांची संख्या वाढत आहे. त्यातही महिलांच्या रेनकोटमध्ये विविध डिझाईन्स पाहण्यास मिळत आहे. जानेवारीत बुकिंग केलेला माल मे महिन्यात दुकानात दाखल झाला.- संजय डोसी, रेनकोट वितरक.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद