शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

औरंगाबादेत सलग तीन लोकसभा निवडणुकांत अपक्षांमुळे बदलले प्रमुख पक्षांच्या विजयाचे चित्र

By विकास राऊत | Updated: April 20, 2024 12:54 IST

तीन निवडणुकांमध्ये ४३ अपक्ष उभे राहिले. त्यातील ४१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मागील तीन निवडणुकीत अपक्षांनी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बदलले, तर काही पक्षांना पराभवाची चव चाखावी लागली.

तीन निवडणुकांमध्ये ४५ अपक्ष उमेदवार लोकसभा रिंगणात होते. या उमेदवारांमुळे प्रमुख राजकीय पक्षांचे मताधिक्य घटले. २००९ आणि २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी रंगत आणली होती. २००९ साली शांतीगिरी महाराजांमुळे काँग्रेसला तर २०१९ साली आ. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचा विजयी रथ रोखला. २०२४ च्या निवडणुकीत किती अपक्ष उभे राहतात आणि किती उमेदवारांच्या विजयाचे गणित त्यांनी घेतलेल्या मतांमुळे बदलते याची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणूक रिंगणातील अपक्ष मिळालेली मते ....सरासरी टक्केवारी२००९..................................१३...........................१ लाख ८४ हजार ४७....२५ टक्के२०१४..................................२३.............................४७ हजार ३५८............१० टक्के२०१९........................०९....................................३ लाख १ हजार १३.........३० टक्के

आतापर्यंत अपवाद वगळता सर्वांचे डिपॉझिट गेले.....माजी आ. हर्षवर्धन जाधव यांना २०१९ साली २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली होती. तर, २००९ साली शांतीगिरी महाराज यांना १ लाख ४८ हजार २६ मते मिळाली होती. शांतीगिरी महाराजांना पडलेल्या मतांमुळे २००९ साली काँग्रेसचे मताधिक्य घटले. तर ,२०१९ साली जाधव यांनी घेतलेल्या मतांमुळे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. तीन निवडणुकांमध्ये ४३ अपक्ष उभे राहिले. त्यातील ४१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.

सर्वाधिक मते यांना ..माजी आ. हर्षवर्धन जाधव यांना २०१९ साली २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली होती. तीन निवडणुकांतील मतांचा आलेख पाहता जाधव यांना अपक्ष उमेदवार म्हणून मिळालेली ही सर्वाधिक मते होती.

सर्वांत कमी मते यांना .....सुरेश फुलारे हे २०१९ साली अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात होते. त्यांना ८६७ मते मिळाली होती. सर्वांत कमी मते मिळालेले उमेदवार म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४