शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

लोकसभेत आपल्याच लोकांनी केला आपलाच घात; पक्षप्रमुखांना दिला जाणार गोपनीय अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 11:15 IST

संपुर्ण जिल्ह्यात मोहीमे व्यतिरिक्त निरीक्षकांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या.

औरंगाबाद : शिवसेनेच्या हातून २०१९ ची लोकसभेची जागा गेली, याचे शल्य पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असून ही जागा कशामुळे गेली, याचा आढावा घेण्यासोबतच जिल्ह्यात पक्ष संघटनेत काय उणीवा आहेत, यासाठी २७ जणांच्या टीमसह पक्षसचिव खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वात शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. यात आपल्याच लोकांनी आपलाच घात केल्याने लोकसभेत पक्षाचा पराभव झाल्याचा अभिप्राय मुंबईहून आलेल्या निरीक्षकांनी तयार केला असून तो पक्षप्रमुखांना गोपनीयरीत्या देण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार मराठवाड्यात २४० जणांचे पथक मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला.

संपुर्ण जिल्ह्यात मोहीमे व्यतिरिक्त निरीक्षकांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या. संघटनेत जातीवाद शिरल्यामुळे सोशल इंजिनिअरींग कोलमडू लागले आहे. याकडे अनेकांनी लक्ष वेधले. संघटनेतील गटबाजी, जातीवाद, शिवसैनिकांना उपजीविकेचे साधन नसल्यामुळे अनेक जण दुरावत चालले आहेत. पक्षाची यंत्रणा सक्षम आहे; परंतु काही अडचणी आहेत. वैयक्तिक ऐवजी संघटनेबाबतची मते निरीक्षकांनी ऐकून घेतली. उशीरा का होईना पक्षाने चार दिवसांत ग्राऊंड रिपोर्ट तयार केला आहे. मराठवाड्यानंतर पश्चिम, उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेण्यात येणार आहे.

किमान चार कार्यकर्ते उभे करासत्ता असताना शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कामे मिळत नाहीत. नेते, आमदारांकडे कामांसाठी अर्ज केले, तर ते केराच्या टोपलीत टाकतात. पालकमंत्री कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठका, कार्यक्रमांना आणायचे म्हटले, तर येण्या- जाण्याची व्यवस्था करण्यात अनेक अडचणी येतात. चार कार्यकर्ते तरी उभे करावेत, अशी भावना निरीक्षकांकडे पदाधिकाऱ्यांनी मांडली. इतर पक्षांतील काल- परवाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची परिस्थिती याबाबत अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. पक्ष काही देणार नाही, तुम्हाला तुमचे अस्तित्व निर्माण करावे लागेल, असे निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांना सांगून शांत केले.

शहरातील तिन्ही मतदारसंघात अभियानशिवसंपर्क मोहीम समारोपाप्रसंगी खा. विनायक राऊत यांनी पक्षाचा झेंडा महाराष्ट्रात फडकत राहण्यासाठी लढण्याचे आवाहन केले. यावेळी माजी खा. चंद्रकांत खैरे, राजू वैद्य, संतोष जेजुरकर यांनी मार्गदर्शन केले. नंदकुमार घोडले, राजेंद्र जंजाळ, कला ओझा, सुनीता आऊलवार, प्रतिभा जगताप, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, संतोष खेंडके, मकरंद कुलकर्णी, वीरभद्र गादगे, चंद्रकात गवई आदींची यावेळी उपस्थिती हाेती.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे