शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

गत लोकसभा निवडणुकीत ४ हजार ९२९ मतदारांनी केला ‘नोटा’चा वापर

By बापू सोळुंके | Updated: April 15, 2024 19:34 IST

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २० लाख ३५ हजार २३ मतदार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’चे बटण दाबून मत व्यक्त करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केली आहे. लोकसभेच्या २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील ४ हजार ९२९ मतदारांनी नोटा या बटणाचा वापर केला होता.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. असे असले तरी प्रत्येक निवडणुकीमध्ये एकूण मतदारांच्या केवळ ६५ ते ७० टक्केच मतदार मतदान करतात. प्रत्येक निवडणुकीमध्ये जास्तीतजास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न केले जातात. मतदार जनजागृती करण्यात येते. बऱ्याचदा निवडणूक रिंगणातील उमेदवार पसंत नाही म्हणून मतदार मतदान करण्याचे टाळतात. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या नावाच्या लिस्टमध्ये शेवटचे बटण नोटा हे आणले. निवडणूक रिंगणातील उमेदवार पसंत नसल्यास नोटा हे बटण मतदारांनी दाबावे, असे आवाहन आयोगाकडून करण्यात येत असते.

२०१९ मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. तेव्हा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस, एमआयएम या प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष असे एकूण २२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ३३ हजार मतदार होते. यापैकी ११ लाख ९८ हजार ७२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण मतदानाच्या ६५ टक्केच मतदान झाले होते. यातही ४ हजार ९२९ मतदारांनी नोटाचे बटण दाबून औरंगाबाद मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करण्यासाठी एकही पात्र उमेदवार नसल्याचे नोंदविले होते.

यंदा २० लाख ३५ हजार मतदारऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात २० लाख ३५ हजार २३ मतदार आहेत. १३ मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. आतापर्यंत उद्धवसेना, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झाली आहे. सत्ताधारी महायुतीने उमेदवार घोषित केला नाही. या वर्षी नोटाऐवजी आपल्याच उमेदवाराला मतदान व्हावे, यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जातील.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४aurangabad-pcऔरंगाबादmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४