शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीने कोर्टाच्या तारखेपूर्वी संपवले जीवन; पोलिसांनी प्रवृत्त केल्याची नातेवाईकांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 12:04 IST

पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा मृताच्या वडिलांचा आरोप

सिल्लोड (औरंगाबाद) : शहरातील एका २६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०:३० वाजता उघडकीस आली. एका बैल चोरीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वी पिशोर पोलिसांनी विनाकारण नाव गोवल्याने हताश आणि नैराश्यग्रस्त झाल्याने मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याची तक्रार मृताच्या वडिलांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

गळफास घेतलेल्या युवकाचे नाव शेख इम्रान शेख इसहाक ( २६, रा.स्नेह नगर, सिल्लोड) असे आहे. याप्रकरणी मृताच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, दोन महिन्यांपूर्वी त्याच्या विरुद्ध कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल होता. एका चोरीच्या गुन्ह्यात सहभाग नसताना पोलिसांनी  त्याला सहआरोपी केले होते. न्यायालयाने त्याला  दोन महिन्यांपूर्वी जामीन दिला होता. मात्र, दर शनिवारी व मंगळवारी त्याला  पिशोर पोलीस ठाण्यात हजेरी लावायची होती. त्यात पिशोर पोलीस ठाण्यातील एक महिला व एक पुरुष कर्मचारी त्याला त्रास देत होते. पैसे दिले नाही तर आणखी खोटे गुन्हे दाखल करू, मोक्का लावू, गावातून हद्दपार करू अशा धमक्या ते दोघे देत होते. खोटा गुन्हा दाखल झाला, विनाकारण पोलीस ठाण्याच्या खेट्या माराव्या लागत आहेत, पोलिसांचा त्रास आणि कुटुंबाची बदनामी झाल्याने मुलगा नैराश्यात गेला होता. यातूनच मुलाने मंगळवारी कोर्टाच्या तारखेला जाण्यापूर्वी सकाळी आत्महत्या केल्याचे मृताचे वडील शेख इसहाक यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दोषी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर  गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

दोषी विरुद्ध कार्यवाही करूदिलेल्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई करू- अशोक मुदिराज, पोलीस निरीक्षक, सिल्लोड शहर.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी