शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत बैठकीवरून स्मार्ट राजकारण; अंबादास दानवेंच्या बैठकीला जिल्हा-शहरप्रमुखांची दांडी

By विकास राऊत | Updated: November 4, 2022 15:13 IST

शिवसेनेत पडद्यामागे जोरदार राजकारण सुरू असून, दानवे यांच्या विरोधात सर्व पदाधिकारी एकवटल्याचे यानिमित्ताने पुढे आले.

औरंगाबाद : शिवसेनेचे राज्यपातळीवर दोन गट पडून पक्षाची वाताहत सुरू झालेली असताना स्थानिक पातळीवरील गटबाजीचे राजकारण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. महापालिकेतील स्मार्ट सिटीच्या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हाप्रमुखांसह सर्व शहरप्रमुखांना निमंत्रित केले होते. या बैठकीला बहुतांश जणांनी दांडी मारून दानवे यांना थेट आव्हानच दिले.

शिवसेनेत पडद्यामागे जोरदार राजकारण सुरू असून, दानवे यांच्या विरोधात सर्व पदाधिकारी एकवटल्याचे यानिमित्ताने पुढे आले. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांना बैठकीला येण्यासाठी दानवे यांच्या स्वीय सहायकाने फोन केला होता. त्यानंतर शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे यांनादेखील निमंत्रित करण्यात आले. परंतु थोरात वगळता कुणीही फिरकले नाही. थोरातही दोन तास उशिरा पोहोचले. डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मनपा हद्दीतील प्रलंबित कामांची माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे यांनी स्मार्ट सिटी कार्यालयाच्या सर्व खातेप्रमुखांसमवेत चर्चा केली. यावेळी मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, शहरप्रमुख थोरात, विधानसभा संघटक राजू वैद्य, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आदी उपस्थित होते.

सामान्यांच्या प्रश्नांचे काय?दीड वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासकीय राजवटीमुळे सामान्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यावर बैठक असती तर पदाधिकाऱ्यांना बोलता आले असते, परंतु कार्पोरेट धोरणांच्या बैठकीत आम्ही काय बोलणार? स्मार्ट सिटीमध्ये काय कामे सुरू आहेत. याबाबत आम्ही काहीही बोलायचे नाही. केवळ त्यांच्या ‘हो ला हो लावण्यासाठी’ आमची तेथे जाण्याची गरजच काय, असा सवाल बहुतांश पदाधिकाऱ्यांनी खाजगीत उपस्थित केला.

अशी सांगितली बैठकीला न येण्याची कारणेमी जाण्याची गरज नव्हतीविरोधी पक्षनेते आहेत. त्यांचे मनपाचे काही प्रश्न असतील, त्यांना काही माहिती लागत असेल. त्यामुळे मला जाण्याची गरज वाटली नाही.-किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख

सिडकोत बैठक होतीसिडको प्रशासकांकडे महत्त्वाच्या मुद्यांवर बैठक होती. त्यामुळे मला दानवे यांच्या बैठकीला जाता आले नाही.-विश्वनाथ स्वामी, शहरप्रमुख

मला उशीर झालामुलांच्या शाळेत एका कार्यक्रमाला गेलो होतो. त्यामुळे मला मनपातील बैठकीला जाण्यास उशीर झाला.-बाळासाहेब थोरात, शहरप्रमुख

वैयक्तिक काम होतेमनपातील बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. परंतु वैयक्तिक कामामुळे जाता आले नाही.-ज्ञानेश्वर डांगे, शहरप्रमुख

मी चाळीसगावला गेलोमला तातडीने चाळीसगावला जावे लागले, त्यामुळे मी बैठकीला येणार नाही, असे सांगितले होते.-विजय वाघचौरे, शहरप्रमुख

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका