शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधीअभावी घरघर, २४८७ कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 19:21 IST

२४८७ कोटी दिले, तर गावांना पाणी; ७३७१ पैकी ५६३४ गावांत काम मंदावले

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधीअभावी घरघर लागली आहे. परिणामी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजीपी) राबविण्यात येणाऱ्या ७३७१ पैकी फक्त १७३७ गावांतील योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत. बाकीच्या गावांतील कामे २५ ते ७५ टक्क्यांदरम्यान अडकली आहेत. ‘हर घर में नल’ हे ब्रीद असलेल्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला २४८७ कोटींचा निधी मिळाला, तर ५६३४ गावांना योजनेतून पाणी मिळेल.

आठ जिल्हा परिषदेत ७ हजार २०५ गावांतील कामे मंजूर झाली. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ हजार १६४ पैकी ६६० कामे पूर्ण झाली. जालन्यात ७३३ पैकी ३२७, परभणी ६६६ पैकी ४७१, हिंगोली ६१६ पैकी ३१५, नांदेड १ हजार २३९ पैकी ६४०, धाराशिव ५९३ पैकी २४६, बीड १ हजार २६५ पैकी ४२१, लातूर जिल्ह्यातील ९२८ पैकी ३४३ योजनांची कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. २७६ गावांत २५ टक्केही पूर्ण झाले नाही. तर, ८८४ कामे ५० टक्क्यांवर आहेत. १ हजार ७७० काम ५० टक्क्यांच्या पुढे सरकली आहेत. एमजीपीअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४, जालना १७, परभणी २४, हिंगोलीत १२, नांदेडमध्ये ३०, धाराशिव २७, बीड २५, तर लातूर जिल्ह्यातील २८ गावांसाठी कामे घेतली. बीड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात एकाही गावांत योजनेचे काम सुरू झालेले नाही, तर लातूरमध्ये २८ पैकी १४ कामे पूर्ण झाली. ४० गावांत ७५ टक्क्यांपर्यत कामे झाली आहेत. तर, २ गावांत २५ टक्क्यांच्या आत, तर १६ गावांत ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

एमजीपीला १ हजार ८९ कोटींची गरजविभागात एमजीपीद्वारे १६७ कामांसाठी आजवर ३ हजार १३६ कोटींचा खर्च झाला. त्यातील फक्त २७ कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे अर्धवट आहेत. मार्च अखेरपर्यंत १ हजार ८९ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.

जि.प.अंतर्गत कामांना १३९८ कोटींची गरजजिल्हा परिषद यंत्रणेमार्फत ७ हजार २०५ पैकी १७०३ कामे पूर्ण झाली आहेत. ५ हजार १९६ पैकी २१५१ कोटी आजवर दिले आहेत. सुमारे १३९८ कोटींचा निधी मार्चअखेरपर्यंत आल्यास पुढील कामांची वाट मोकळी होईल.

जिल्हानिहाय कामांना निधीची गरजजिल्हा....... एमजीपीसाठी आवश्यक निधी..................जि.प.साठी आवश्यक निधी

छत्रपती संभाजीनगर ............... २५१ कोटी .........................२६१ कोटीजालना             ............... ६२ कोटी ..............................१५१ कोटी

परभणी .................५२ कोटी ..............................१०६ कोटीहिंगोली ............... ५० कोटी .......................८० कोटी

नांदेड             ...............३५२ कोटी ..............................३१२ कोटीधाराशिव             ............... १२५ कोटी ..............................९३ कोटी

बीड                         ............... ८३ कोटी ..............................३०० कोटीलातूर             ............... ११२ कोटी ..............................९३ कोटी

एकूण             - १०८९ कोटी ..............................१३९८ कोटी

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणी