शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
6
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
7
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
8
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
9
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
10
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
11
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
12
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
13
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
14
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
15
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
16
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
17
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
18
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
19
'हवा' टाईट...! विमानातून स्कायडायव्हरची उडी अन् पॅराशूट पंखात अडकलं, पुढे काय झालं? (VIDEO)
20
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात वर्षभरात वीज चोरांकडून २९ कोटी रुपयांचा दंड वसूल

By साहेबराव हिवराळे | Updated: July 11, 2024 19:26 IST

मराठवाड्यात राबविलेल्या मोहिमेत महावितरणची धडक कामगिरी

छत्रपती संभाजीनगर : वीज चोरांविरुद्ध महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत वर्षभरात ४,६९८ वीज मीटरच्या तपासणीत ३,७०४ मीटरमध्ये वीज चोरी केल्याचे आढळले. यात ४ कोटी १७ लाख २१ हजार ३४४ युनिटच्या वीज चोरीप्रकरणी ३१ कोटी ९७ लाख ११ हजार रुपयांच्या अनुमानित वीजबिल दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात आली होती. तर २८ कोटी ७९ लाख ४४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यांत एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविली होती.

एकीकडे वीज चोरी तर जनतेला पूर्णत: वीज सुरळीत देत नसल्याने व स्मार्ट मीटरच्या बडग्याने मोर्चे महावितरणवर येत आहेत. तत्काळ बिघाडाकडेही लक्ष देण्याची मागणी ग्राहकांमधून कायम आहे.

वीज चोरीची रक्कम लाख रुपयांमध्ये पुढीलप्रमाणेवीज चोरी पथक ------                         वीज ग्राहक ------ चोरीची रक्कमछत्रपती संभाजीनगर शहर             -- ७४४             ---             ६६०.०६छत्रपती संभाजीनगर ग्रामीण ---- ३४९             ---             ३२५.३६जालना                         ---------४४०             ---------४३८.९७छत्रपती संभाजीनगर परिमंडळ --- १,५३३             ----------१४२४.३९बीड                         ---२७९                                     --- २७८.५४धाराशिव                         ---२५१                         --------३०१.८४लातूर                         -----३६८                         ----------३४५.५८लातूर परिमंडळ             ----८९८ ------------- ९२५.९६नांदेड --------------- ३१३ --------------२०३.९९हिंगोली -------२७१             ------------२०४.०२परभणी            ------६८९            --------४३८.७५नांदेड परिमंडळ -----१,२७३             ---८४६.७६मराठवाडा एकूण --             ३,७०४ ----- ३,१९७.११

अधिकृत वीज कनेक्शन घ्या; अन्यथा दंडात्मक कारवाईवीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करताना आढळल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा.- राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण प्रादेशिक कार्यालय

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाelectricityवीज