शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

मराठवाड्यात सहा वर्षांत जीवन संपवलेले ५० टक्के मराठा, तर १३ टक्के ओबीसी शेतकरी

By विकास राऊत | Updated: February 14, 2024 11:44 IST

दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, हमीभाव आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी जीवन संपवत आहेत

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सहा वर्षांत ५ हजार ६६३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात ५० टक्के आत्महत्या मराठा सामाजातील शेतकऱ्यांच्या असल्याची प्राथमिक माहिती विभागीय प्रशासनाने संकलित केलेल्या विश्लेषणातून समोर आली आहे. १३ टक्के आत्महत्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजातील आहेत. ८ फेब्रुवारी रोजी मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील आत्महत्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाने दिले हाेते. प्रशासनाने संकलित माहिती आयोगाला पाठविली आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, हमीभाव आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आत्महत्यांमधील प्रवर्गनिहाय डेटा समोर आणून आयोग त्याचे विश्लेषण करणार आहे.

सहा वर्षांत २ हजार ८६८ मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर १३ टक्के आत्महत्या इतर मागासवर्गाच्या म्हणजे ओबीसी समाजातील शेतकऱ्यांच्या आहेत. उर्वरित ३७ टक्के आत्महत्या इतर सर्व समाजातील शेतकऱ्यांच्या आहेत. दरम्यान, उच्च शिक्षणात कोणत्या प्रवर्गाचे किती विद्यार्थी आहेत, याची माहिती संकलित करण्याचा विचार मागासवर्ग आयोगाने केला आहे. सेकंडरी डेटा हाताशी असावा म्हणून आयोगाने माहिती घेण्याचे ठरविले आहे.

मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यासह इतर मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य मागास आयोगाने २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान मराठासह खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण केले. विभागात २ कोटी ४ लाख ६७ हजार ५९४ कुटुंबांपैकी जवळपास ४३ लाख २५ हजार कुुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. याचे विश्लेषण सुरू आहे.

प्रवर्गनिहाय शेतकरी आत्महत्याजात..............आत्महत्या........ टक्केवारीमराठा...........             २८६८........... ५०.६४इतर मागास प्रवर्ग........ ७७२.......... १३.६३अनु. जाती......... ३८६............६.८१अनु. जमाती......... १६८............ २.९६विमुक्त जाती........... २७२............ ४.८०भटक्या जमाती (ब)......... ११३.......... १.१९भटक्या जमाती (क)........... ४४८........... ७.९१भटक्या जमाती (ड)........... ४०५.............. ७.१५विशेष मागास प्रवर्ग.............. ७३................ १.२८इतर खुला प्रवर्ग .................१५८ ................२.७९

वर्ष ........एकूण आत्महत्या२०१८.......... ९४७२०१९ ..........९३७२०२० ...........७७३२०२१ ..........८८७२०२२ ............१०२२२०२३ ...........१०९७--------------------------------एकूण............. ५६६३

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMaratha Reservationमराठा आरक्षणMarathwadaमराठवाडा