शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘हिट अँड रन’ प्रकरणात मृताला २ लाख, तर गंभीर जखमीला ५० हजार रुपये मिळणार

By सुमित डोळे | Updated: August 24, 2024 13:21 IST

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लागू करा : पाेलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर :अपघातात धडक देऊन पसार झालेले वाहन व चालकाचा गुन्हा दाखल झाल्यापासून ३० दिवसांच्या आत शोध न लागल्यास मृताच्या कुटुंबाला २ लाख रुपये, तर गंभीर जखमीला ५० रुपये विम्याची रक्कम मदत म्हणून मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २०२२ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी केली आहे. सर्व पोलिस ठाण्यांच्या दर्शनी भागात, सार्वजनिक ठिकाणी माहितीचे पोस्टर लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. जवळपास २५ टक्के अपघातात वाहनचालक पसार होतात. महामार्गांवरील अपघात, रात्रीचे अपघात किंवा सीसीटीव्हीच्या अभावामुळे अनेक अपघातांत पोलिस आरोपी चालक शोधू शकत नाहीत. त्यामुळे मृताचे कुटुंबीय किंवा जखमींना मोठी आर्थिक हानी सहन करावी लागते. २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेत केंद्र सरकारला मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानंतर रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने २५ फेब्रुवारी २०२२ रोजी अधिसूचना जारी केली.

२३ पोलिस ठाण्यांना दिले आदेशजिल्ह्यातील पाच उपविभागांचे उपविभागीय अधिकारी यासाठी प्राधिकृत अधिकारी असतील. अधीक्षक राठोड यांनी नुकतेच जिल्ह्यातील २३ पोलिस ठाण्यांना याची अंमलबजावणीचे आदेश दिले. सर्वांना तसे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘हिट अँड रन’ केसमध्ये पसार वाहन, चालक अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यापासून ३० दिवसांत निष्पन्न न झाल्यास अहवाल तयार करावा. ३० दिवसांत तो संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करावा. त्यांच्या मंजुरीनंतर अंतिम समिती त्याची खातरजमा करून १५ दिवसांत मंजुरी देतील.

सप्टेंबरपासून लागूवाहतूक विभागाचे निरीक्षक किशोर पवार या प्रक्रियेचे नोडल अधिकारी असतील. ऑगस्टपासून जिल्ह्यात दाखल अपघातांच्या गुन्ह्याबाबत हे आदेश लागू होतील. म्हणजेच, सप्टेंबरमध्ये आरोपी वाहनचालक निष्पन्न न झालेल्या अपघातांचे प्रस्ताव सादर होतील. नातेवाईक स्वत:हून देखील संबंधित ठाणे किंवा जिल्हा वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात संपर्क करू शकतील, असे पवार यांनी स्पष्ट केले.

गंभीर जखमीचा नियमगंभीर जखमीच्या व्याख्येत जखमी व्यक्ती १९ दिवस रुग्णालयात दाखल असावा. शिवाय, तो गंभीर जखमी असल्याचा डॉक्टरांचा सविस्तर अहवाल हवा. समिती त्याची खातरजमा करेल.

वर्षे - आरोपी वाहनचालक अज्ञातच२०२३ - ९०२०२४ - ५२(जुलै)

अपघातांची संख्या वाढलीवर्षे - एकूण अपघात - मृत्यू - गंभीर जखमी२०२३ - ७८८ - ४७५ - ४३७२०२४ - ४४८ - २९५ - २१४(जुलै)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातPoliceपोलिस