शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळिमा! अल्पवयीन मुलीवर सख्ख्या भावासह भाऊजीचा अत्याचार, पीडिता गर्भवती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 15:57 IST

गंगापूर तालुक्यातील नात्याला काळीमा फासणारी घटना; आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

गंगापूर ( छत्रपती संभाजीनगर ) : नात्याला काळीमा फासणारी घटना तालुक्यातील बोरगाव येथे घडली असून सख्या भावासह मावस भाऊजीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलीचा १९ वर्षीय भाऊ आणि नांदगाव येथील मावस भाऊजीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या मावस बहिणीच्या नवऱ्याने डिसेंबर २०२२ मध्ये तालुक्यातील बोरगाव येथे मुलीच्या घरी कोणी नसताना ''माझे तुझ्यावर प्रेम आहे ''असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला. तसेच वाहेगाव येथेही रात्रीच्या वेळे अत्याचार केला. दरम्यान, पिडीता गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस आले. गुन्हा दाखल करताना सुरुवातीला मावस भाऊजीचे नाव पुढे आले, पण चौकशीत पीडितेच्या सख्खा भावाने देखील नववीच्या वर्गात शिकत असल्यापासून ते डिसेंबर २०२२ दरम्यान बोरगाव येथील राहत्या घरात वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

याप्रकरणी शनिवारी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून सोमवारी (२०) रोजी गंगापूर न्यायालयात उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक डी.एस.साखळे, पोलीस नाईक सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार भरत घुगे, महिला पोलीस हवालदार निंबोरकर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद