शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
3
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
4
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
5
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
6
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
7
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
8
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
9
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
10
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
11
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
12
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
13
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
14
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
15
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
16
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
17
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
18
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
20
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 

पुन्हा एकदा चोरट्यांची लग्नात हातसफाई; ७ तोळे सोन्यासह रोख रक्कम, मोबाइल लंपास

By राम शिनगारे | Updated: December 11, 2023 12:10 IST

शहरात गेली आठ वर्षे नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान लग्नांमध्ये दागिने, रोख रकमेच्या बॅगा चोरीला जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनंतर लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात झाल्यानंतर कार्यालयातून दागिन्यांसह इतर ऐवज चोरण्यासाठी धडाकाच चोरट्यांनी लावला आहे. त्यात आणखी एका घटनेची भर पडली. सेव्हन हिल परिसरातील अतिथी हॉटेलमधील लग्नातून चोरट्यांनी ७ तोळे सोने, १६ हजार रुपये रोख आणि मोबाइल असा साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. २४ नोव्हेंबरपासून ही सहावी घटना आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

अवंती शिरीष कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे भाऊ जयेश कुलकर्णी यांच्या लग्नाचा सोहळा अतिथी हॉटेलच्या डायमंड हॉलमध्ये आयोजित केला होता. ५ डिसेंबरच्या सायंकाळपासून ते ६ डिसेंबरच्या संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सोहळा चालला. सप्तपदी सुरू असताना शिरीषच्या आईने त्यांची पर्स अवंतीकडे दिली. त्याच वेळी अवंती यांना बहिणीने हाक मारली असता त्यांनी पर्स खाली ठेवली आणि बहिणीकडे आहेर देण्यासाठी गेल्या. तितक्यात पर्स चोरीला गेली. पर्समध्ये साडेतीन तोळ्यांची पोत, ३१ ग्रॅमचे गंठण, तीन ग्रॅमचे टॉप्स आणि २ ग्रॅमची कर्णफुले, १६ हजार रुपये रोकड, १५ हजारांचा मोबाइल, असा चार लाख ५९ हजार ५२४ रुपयांचा ऐवज होता. हा प्रकार लक्षात आल्यावर ९ डिसेंबरला सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक फौजदार बन करीत आहेत.

२४ नोव्हेंबरपासून सहावी घटना२४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत शहरातील प्रसिद्ध हॉटेल, मंगल कार्यालयात चोरीच्या सहा घटना उघडकीस आल्या. त्यात पहिली घटना हर्सूलच्या मधुरा लॉनमध्ये घडली. त्यानंतर सूर्या लॉन्स, हॉटेल रामा, हॉटेल जिमखाना या ठिकाणी चोऱ्या झाल्या. त्यानंतर पाचवी घटना बीड बायपासवरील एका बड्या हॉटेलमध्ये घडली. मात्र, त्या प्रकरणात गुन्हा नोंदवला नाही. सहावी घटना अतिथी हॉटेलमध्ये उघडकीस आली. ३ डिसेंबर रोजी हॉटेल रामा व औरंगाबाद जिमखाना येथे घडलेल्या चोरीत एकच चोर असल्याचे निष्पन्न झाले.

आनंदाच्या क्षणात नुकसान टाळा-शहरात गेली आठ वर्षे नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान लग्नांमध्ये दागिने, रोख रकमेच्या बॅगा चोरीला जात आहेत.- गर्दीत प्रत्येकाला तपासणे, संशय घेणे दोन्ही कुटुंबांना अशक्य असते. शिवाय, हॉटेल, लॉनचालकाला देखील प्रत्यक्षात ते शक्य नसते.- वधू, वराचे दागिने सांभाळण्यासाठी जबाबदार व्यक्ती निवडा.- भेटीत येणारी रोख रकमेची पाकिटे सांभाळा.- अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे असलेले लॉन, हॉटेल लग्न व अन्य कार्यक्रमासाठी निवडा.- कॅमेरे असल्यास ते सुस्थितीत, सुरू आहेत का, याची खात्री करा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद