शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही पक्षांत 'इनकमिंग' वाढल्याने भाजप-शिंदेसेना युतीला विलंब; ९ बैठकानंतरही निर्णय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:52 IST

मनसे आणि उद्धवसेना यांच्यात युती झाली असली तरी त्यांच्यामध्ये वर्चस्वावरून वाद सुरू

छत्रपती संभाजीनगर : शिंदेसेना भाजपमध्ये जागावाटपासाठी ९ बैठका झाल्या. आता किरकोळ जागांवर अंतिम चर्चा सुरू आहे. महापालिकेवर भगवा फडकवण्याचे दोन्ही पक्षांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दोन्ही पक्षांत प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने जागावाटपाचा निर्णय घेण्यास थोडा वेळ लागत आहे. आज किंवा उद्या निर्णय होईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी रविवारी (दि. २८) पत्रकारांना सांगितले. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, मनसे आणि उद्धवसेना यांच्यात युती झाली असली तरी त्यांच्यामध्ये वर्चस्वावरून वाद सुरू असल्याचे शिरसाट यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

पुण्यात शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी पक्ष घेईल. तसेच त्यांची कोणी कोंडी करत असेल तर त्यावर उपायही आमच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी एकत्र नाही, काँग्रेसचा विषय वेगळा आहे, शरद पवार महाविकास आघाडीसोबत लढणार का, हादेखील प्रश्न असल्याचे शिरसाट यांनी नमूद केले.

दरम्यान, एमआयएम, बसप, राष्ट्रवादी अजित पवारने काही प्रभागातील उमेदवारांच्या याद्या जाहीर करून बाजी मारली आहे. भाजप, शिंदेसेना, काँग्रेस, उद्धवसेनेकडून अद्याप काहीही पत्ते ओपन झालेले नाहीत.

अर्ज भरण्यासाठी होणार गर्दीमहापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचा निर्णय झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व कार्यालयांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. ४,७२० उमेदवारी अर्जाची विक्री झालेली आहे. फक्त १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २९ प्रभागांतन अ, ब, क, ड या आरक्षणानुसार ११५ वॉर्डासाठी उमेदवारी अर्ज दाखल होतील. चार वॉर्डाचा एक प्रभाग आहे. सोमवारी आणि मंगळवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या अंतिम आकड्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. दरम्यान सोमवारी आणि मंगळवारी आठ ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्यांची गर्दी नियंत्रित करता-करता प्रशासनाला नाकीनऊ येणे शक्य आहे. 

प्लॅन बी तयारआतापर्यंत फक्त १७ अर्ज दाखल झालेले आहेत. महापालिका निवडणूक लढविण्यास अनेक जण सज्ज असले तरी राजकीय पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर न केल्याने पक्षासह अपक्षांनीही उमेदवारी दाखल करणे टाळले आहे. प्रत्येक उमेदवारांनी आपला प्लॅन बी तयार ठेवल्याचे यावरून दिसते आहे.

वकिलांची कार्यालये गजबजलीरविवारी अनेक ठिकाणी वकिलांकडे उमेदवारी अर्ज भरून घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. सर्व एनओसी, स्थावर-जंगम मालमत्ता, आधार, पॅनकार्ड, आयकर विभागाचे वार्षिक विवरण पत्र, चारित्र्य प्रमाणपत्रांसह इतर कागदपत्रे घेऊन उमेदवार वकिलांच्या कार्यालयात तासनतास बसून होते.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Shinde Sena alliance delayed due to increased 'incomings,' no decision after nine meetings.

Web Summary : Seat sharing between BJP and Shinde Sena faces delays due to increased party entrants. Final decision awaited after nine meetings. Nomination rush expected as deadlines approach.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६