शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात तृतीयपंथीयांना चौकांसह उत्सव, कार्यक्रमात जाऊन पैसे मागण्यासही मनाई

By सुमित डोळे | Updated: August 9, 2024 14:50 IST

छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी काढले विशेष आदेश

छत्रपती संभाजीनगर : गुन्हे दाखल होऊनही शहरातील काही चौकांमध्ये तृतियपंथीयांचे पैसे मागण्याचे प्रकार थांबले नाही. त्यामुळे आता एकट्याने, समूहाने फिरून शहरात कुठल्याच भागात आस्थापना, लग्न, उत्सवात तृतीयपंथीयांना पैसे मागण्यासाठी जाता येणार नाही. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी याबाबत विशेष अधिकारान्वये आदेश जारी केले. पोलिस आयुक्त पवार यांच्या आदेशानुसार, दि. ९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू असतील. आवश्यकतेनुसार, त्या पुढे नव्याने हे काढले जातील.

मंगळवारी ‘आक्षेपार्ह इशारे’, ‘स्पर्श करून पैशांची मागणी’ करणाऱ्या सहा तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, तरीही शहानूरमियाँ दर्गा चौकात बुधवारी तृतीयपंथी पैसे मागताना आढळून आले. पोलिसांनी चौकात बंदी घातल्यानंतर तृतीयपंथीयांकडून शोरुमध्ये नवे वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना हेरून, मोंढा, बाजारपेठ, लग्न, मुंज, वास्तुशांती सांरख्या कार्यक्रमांमध्ये जाऊन अव्वाच्या सव्वा पैशांसाठी दादागिरी केल्याच्या तक्रारी उघडकीस येऊ लागल्या. नागरिकांना होणाऱ्या या मन:स्तापाबाबत पोलिस आयुक्त पवार यांनी कठोर भूमिका घेण्याचे निश्चित केले होते.

काय म्हटलेय आदेशात ?-उपद्रव किंवा मोठ्या प्रमाणावर जनतेला धाेका निर्माण होण्यापासून रोखण्याच्या हेतूने भारतीय न्याय संहितेच्या १६३ नुसार पोलिस आयुक्तांना असे आदेश काढण्याचे अधिकार आहेत.-त्यात अन्य भिक मागणाऱ्यांसह प्रामुख्याने तृतीयपंथीयांना एकट्याने, समुहाने शहरात फिरण्यास, निवासस्थान, आस्थापने, सार्वजनिक ठिकाणी भेट देण्यास मनाई करण्यात आली आहे.-शिवाय, कुटूंबातील जन्म, मृत्यू, लग्न किंवा कुठल्याही उत्सवात भेट देण्यासही मनाई असेल.-चौक, ट्राफिक जंक्शन, रस्त्यावरही वाहनचालक, प्रवासी, नागरिकांकडून पैसे घेण्यास सक्त मनाई असेल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद