शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

छत्रपती संभाजीनगरच्या रत्यावर पोलिसच पोलीस; तब्बल ७ हजार २७० पोलिस तैनात,कारण काय?

By सुमित डोळे | Updated: September 14, 2023 13:27 IST

१४ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर एकूण दिवस ४ बंदोबस्तास- ७ हजार २७० पोलिसांचा बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर : येत्या चार दिवसांमध्ये शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन असून यासाठी अति महत्त्वाच्या व्यक्ती शहरात येत आहेत. या सर्वांची सुरक्षा व बंदोबस्ताची जबाबदारी पोलिस विभागावर आहे. पहिल्यांदाच एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हीआयपी व कार्यक्रमांची रेलचेल आहे. यासाठी येत्या चार दिवस ७ हजार २७० पोलिसांचा कडेकोट बंदाेबस्त राहील. यात प्रामुख्याने १० पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक व ३० उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत हे सर्व हजर झाल्यानंतर जबाबदारीचे वाटप होणार आहे.

काय आहे दोन-तीन दिवसांत?१६ सप्टेंबर मंत्रिमंडळ बैठक१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृतमहोत्सव

बंदोबस्त कधीपासून?१४ सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर एकूण दिवस ४ बंदोबस्तास- ७ हजार २७० पोलिस यात ४ हजार २७० पोलिस बाहेरील जिल्ह्यातून येणार

कोण कोण येणार?मंत्रिमंडळ बैठकीस : मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळ, आमदार, उच्चपदस्थ अधिकारीमुक्तिसंग्राम दिनास : भारताचे सरन्यायाधीश डी वाय. चंद्रचूड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सर्वोच्च न्यायालयाच्या मुंबई, कर्नाटक व मद्रासच्या खंडपीठातील न्यायमूर्ती, देशाचे अतिरिक्त महाअधिवक्ता

शहर पोलिसांचा बंदोबस्तपोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपायुक्त, ५ सहायक आयुक्तांसह, २५ पोलिस निरीक्षक, ९६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक असा एकूण ३ हजार २०० पोलिस सलग तीन दिवस बंदोबस्तात असतील.

बाहेरून आलेले अधिकारी किती?१० पाेलिस अधीक्षक-अपर अधीक्षक, ३० सहायक आयुक्त /उपाधीक्षक, १६० पोलिस निरीक्षक, ४०० सहायक निरीक्षक / उपनिरीक्षक, पुरुष कर्मचारी २५००, तर महिला कर्मचारी ३००, वाहतूक पोलिस अधिकारी २०, वाहतूक कर्मचारी १५०, होमगार्ड ५००, एसआरपीएफचे ४ प्लाटून, ६ बॉम्ब शोधक नाशक पथक बुधवारपासून शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे