शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत ४ विद्यापीठांचे प्रभारी; कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंकडे संत गाडगेबाबा विद्यापीठाची सूत्रे

By योगेश पायघन | Updated: February 4, 2023 19:01 IST

संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे हे कुलगुरू पद रिक्त झाले होते.

औरंगाबाद :अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सुत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आज स्विकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदासह आतापर्यंत पाच विद्यापीठात कुलगुरुपद सांभाळण्याचा सन्मान डॉ. येवले यांना मिळाला आहे. 

संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे २८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यामुळे हे कुलगुरू पद रिक्त झाले होते. या पदावर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी त्यांची नियुक्ती केली. प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला. यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांनी डॉ. प्रमोद येवले यांचा सत्कार केला. डाॅ. येवले म्हणाले, हा आनंदाचा क्षण नाही. परंतू डॉ. मालखेडे यांचे अपूर्ण काम आता पुढे न्यायचे आहे. असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. नव्या शैक्षणिक धोरणाची माहीती महाविद्यालये, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली पाहीजे. आर्थिक बाबतीत स्वायत्त संस्था स्वत:च्या पायावर उभी रहावी. त्यादृष्टीने आपल्या विद्यापीठाचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यासाठी सर्वांना प्रयत्न करू. तसेच कर्मचा­यांनी संप न करता त्यातून मार्ग काढावा. त्यासंदर्भात उच्च शिक्षणमंत्र्यांशी बोलू असेही त्यांनी स्पष्ठ केले.

विद्यापीठ विकास अन् प्रगतीस प्राधान्यविद्यापीठात शैक्षणिक पावित्र्य, गुणवत्ता राहिली पाहिजे. गुणवत्ता वाढीचा प्रयत्न विद्यापीठासोबत महाविद्यालयांची सुद्धा जबाबदारी आहे. विद्यापीठ विकास अन् प्रगतिसाठी समाजाचा विश्वास आवश्यक आहे. विद्यापीठाची प्रतिष्ठा वाढवतांना सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. विविध प्राधिकारणांचे गठण, नॉमिनेशन, दीक्षांत समारंभासह अनेक महत्वाची कामे करतांना परीक्षेचे काम वेळेत पूर्ण करावयाचे आहेत. 

आतापर्यंत चार विद्यापीठांचे कुलगुरू पद संभाळलेडॉ. येवले यांनी यापुर्वी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, रामटेक येथील कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठ, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ जुलै २०१९ पासून कुलगुरुपदी कार्यरत आहेत. फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाची अध्यक्षपद ही त्यांनी भुषविले असून महात्मा गांधी हिंदी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादAmravatiअमरावतीEducationशिक्षण