शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भांडण बायकोसोबत; पतीने दुचाकी चोरून काढला राग

By राम शिनगारे | Updated: January 5, 2023 18:57 IST

गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील आरोपीस ठाेकल्या बेड्या : तीन लाखांच्या सहा दुचाकी केल्या हस्तगत

औरंगाबाद : बायकोसोबत भांडण झाल्यामुळे घर सोडल्यानंतर काय करावे या विवंचनेत पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चक्क दुचाकी चोरींचा सपाटाच लावला. या दुचाकी चोरास अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीकडून ३ लाख १० हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

प्रदीप बाबुराव जाधव (२४, रा. गल्ली क्र ५, संजयनगर, मुकुंदवाडी) असे अटकेतील दुचाकी चोराचे नाव आहे. प्रदीप हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी विमानतळाच्या समोरील संघर्षनगर येथील मैदानावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकास मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून प्रदीपला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ताब्यातील दुचाकी मुकुंदवाडी आणि एमआयडीसी सिडको हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या. हि कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, अजहर कुरेशी, सहायक फौजदार शेख हबीब, जमादार विजय निकम, दत्तात्रय गडेकर, पोलीस नाईक राजेंद्र साळुंके, संजय गावंडे, संजय मुळे, तात्याराव शिनगारे, संदीप जाधव नितीन देशमुख यांनी केली.

१५ दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडणआरोपी प्रदीप जाधव हा पुर्वीपासून चोरीसह इतर प्रकारचे गुन्हे करीत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून त्याने चोऱ्या करणे बंद केले होते. १५ दिवसांपूर्वी घरात बायकोसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यातुन त्याने घर सोडले. घर सोडल्यानंतर काय करावे या विवंचनेत असतानाच त्याने दुचाकी चाेरण्यास सुरूवात केली. त्यातुन आलेल्या पैशातून तो मौजमज्जा करीत असल्याची कबुलीही त्याने पोलिसांना चौकशीत दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद