शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! ठाण्याच्या आवारातच पोलिस निरीक्षकावर हवालदाराचा चाकू हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 22:35 IST

पीआय केंद्रे यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती आहे.

औरंगाबाद: जिंसी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्यावर पोलिस हवालदारानेच चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री 8. 30 वाजता जिंसी पोलिस ठाण्यात घडली. ठाण्याच्या आवारातच केंद्रे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. केंद्रे यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती आहे.

मुजाहेद शेख असे आरोपी हवालदारचे नाव आहे . त्याने दोन महिन्यांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती, असे कळते. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पोलिसांच्या बदल्यात शेखची बदली बेगमपुरा पोलिस ठाण्यात झाली होती. यानंतर त्याने व्हीआरएस घेतल्याची माहिती आहे. 

या हल्ल्याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे हे मंगळवारी रात्री पोलिस ठाण्याच्या परिसरात आयोजित गौरव समारंभात होते. स्थानिक पत्रकार आणि नागरिकांनी कोविड काळात पीआय केंद्रे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल गौरव ठेवला होता. हा समारंभ संपत असतानाच आरोपी शेख तेथे आला आणि तुम्ही सर्व जण केंद्रे यांची खोटी प्रशंसा करीत आहात असे म्हणून त्यांना शिविगाळ करू लागला.  पीआय केंद्रे यांनी त्याला शिविगाळ का करतो , तुझे म्हणणे काय आहे असे विचारले. त्यानंतर शेख याने थेट चाकू काढून त्यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. पहिला वार पोटावर ,दुसरा छातीवर केल्यानंतर तिसरा वार करीत असताना केंद्रे यांनी चाकू हातात पकडला.

दरम्यान, हल्ल्यात पीआय केंद्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ  खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त निखिल गुप्ता , उपायुक्त  दीपक गिरहे,  आणि अन्य अधिकाऱ्यानी दवाखान्यात धाव घेतली. गंभीर जखमी पीआय केंद्रे यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद