शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ७०० रुपयांसाठी मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; आरोपीस शिर्डीत पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 16:12 IST

दुकानातील गल्ल्यात ७०० रुपयांचा हिशोब लागत नव्हता, यावरून बापलेकात झाला वाद

औरंगाबाद: पुंडलिक नगर येथे आज सकाळी राहत्या घरात कलंत्री दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने निर्घृण खून करून मृतदेह पलंगाच्या खाली लपवून आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार  झाला होता. या खुनाचा उलगडा झाला असून मुलानेच केवळ ७०० रुपयांसाठी आई-वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी मुलगा आकाश हिरालाल कलंत्री यास शिर्डी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, पुंडलिक नगर येथे शामसुंदर  हिरालाल कलंत्री ( ५५) यांचे भांडे विक्रीचे दुकान आहे. शनिवारी मुलगा किरण याने हिशोबात घोळ केल्याचे वडील हिरालाल यांच्या लक्षात आले. त्यांनी हिशोबात कमी असलेले ७०० रुपयांचा जाब मुलगा आकाशला विचारला. यातून बापलेकात वाद झाले. यामुळे संतापलेल्या आकाशाने वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली. यावेळी घरी असलेल्या सावत्र आई  किरण (४५ ) यांना देखील आकाशाने संपवले. यानंतर दोघांचे मृतदेह  वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाच्या खाली लपवून तो फरार झाला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आकाशचे लोकेशन ट्रेस केले. तो शिर्डी येथे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी लागलीच याची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. शिर्डी पोलिसांनी कारवाई करत लागलीच आकाशला ताब्यात घेतले आहे. 

बहिणीला सांगितले नातेवाईकांचा अपघात झालादरम्यान, आईवडिलांच्या खुनानंतर आकाशने सावत्र बहिणीला आम्ही नातेवाईकांचा अपघात झाल्याने धुळे येथे जात आहोत, तू काकांकडे थांब असे सांगितले होते. तिने रविवारी वडिलांचा दोन लागत नाही म्हणून घर गाठले. मात्र, घराला कुलूप असल्याने ती माघारी फिरली. चिंतेत असलेली मुलगी आज सकाळी पुन्हा घरी आली. यावेळी घरातून तीव्र दुर्गंधी येते होती. यामुळे मावशी सविता हिने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर कलंत्री दाम्पत्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच मुलगा आकाश गायब असल्याने, बहिणीने दिलेली माहिती यावरून पोलिसांनी तपास सुरु केला. तपासांती पोलिसांनी आकाशचा शोध लावत त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीArrestअटक