शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नात्यातील मुलीसोबत प्रेमसंबंध; तरुणीच्या नावे भावाने मेसेज केला, प्रेमी येताच केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 13:47 IST

कन्नड तालुक्यातील घटनेत आरोपीस पोलीस कोठडीत सुनावली आहे

हतनूर (औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील टापरगाव येथील विशाल रमेश लव्हाळे या तरुणाचा चुलत मावस बहिणीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मावस भावास अटक केली असून न्यायालयाने त्यास शुक्रवारी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टापरगाव येथील विशाल रमेश लव्हाळे याचे खुलताबाद तालुक्यातील चिंचोली येथील त्याच्या चुलत मावस बहिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. सदरील मुलगी वडिलांच्या मोबाइलवरून विशालसोबत बोलत असे. तसेच चॅटिंग करीत असे. याची कुणकुण लागल्याने सदरील मुलीचा भाऊ आरोपी कृष्णा दिगांबर पवार याने त्याच्या वडिलांच्या मोबाइलवरून सदरील मुलीच्या नावाने बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मेसेज पाठवून विशाल यास चिंचोली शिवारात बोलावून घेतले. त्यामुळे विशाल हा दोन मित्रांसह चिंचोली शिवारात गेला असता आरोपी कृष्णा दिगांबर पवार याने रागाच्या भरात काही कळण्याच्या आत त्याच्या जवळील लाकडी दांड्याने चुलत मावस भाऊ विशालच्या डोक्याच्या पाठीमागे जोरदार वार केला. तसेच विशालच्या दंडावर, खांद्यावर, मांडीवर जबर मारहाण केली. सोबतच्या मित्रांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला ; परंतु कृष्णा पवार याने त्यांना जुमानले नाही. दरम्यान लाकडी दांड्याचा खनाच्या भागाचा जोराचा फटका बसल्याने विशालच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झाली. जखमी अवस्थेत त्यास त्याच्या घराजवळील मंदिराजवळ सोडण्यात आले. यानंतर विशाल घरी गेला व अंघोळीसाठी अंगावरील कपडे काढत असताना खाली कोसळला. त्यानंतर त्यास उपचारासाठी हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी मृत घोषित केले.

आरोपीला घरातून केली अटकलाकडी दांडक्याने डोक्यात वार करून विशाल लव्हाळे यास जिवे मारल्या प्रकरणी मयताचे वडील रमेश सांडू लव्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी कृष्णा दिगांबर पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस गुरूवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अटक केली. त्यानंतर शुक्रवारी आरोपीस कन्नड येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.आर. भालेराव, सहायक पोलीस निरीक्षक राम बारहाते पुढील तपास करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद