शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

आंबेडकरनगरात झोपड्यांच्या झाल्या माड्या अन् मुले चढताहेत प्रगतीच्या शिड्या !

By साहेबराव हिवराळे | Updated: July 1, 2023 20:43 IST

एक दिवस एक वसाहत: मुले बनली उपजिल्हाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, पोलिस, उद्योजक

छत्रपती संभाजीनगर : जळगाव रोडच्या पूर्वेला सिडको एन-७ लगत उभारलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगरातील युवक-युवतींनी शिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात केली असून, गवंड्याच्या मुलीने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. तसेच, बहुतांश युवक-युवती पोलिस, नर्स, अधिकारी बनले आणि उद्योजकही तयार होत आहेत. आंबेडकरनगरातील झोपड्यांच्या माड्या झाल्या असून, मुले आता प्रगतीच्या शिड्या चढत आहेत, असे अभिमानाने पालक सांगतात.

शिक्षणाच्या माध्यमातून युवक आता बँकेत, मॉल्समध्ये नोकऱ्या करतात आणि मार्केटिंगही करताना दिसतात. रिकामे राहण्यापेक्षा अनेकांनी व्यावसायिकतेचे धडे घेतले आहेत. बाजूलाच जाधववाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत मालवाहतूक करण्यासाठी रिक्षा, मेटॅडोअरची संख्याही येथे बऱ्यापैकी असल्याने आर्थिक स्रोत मिळाले आहेत. त्यामुळे रिकामे फिरणाऱ्यांना पालकही आता पोसायला तयार नाहीत. कारण महागाईच्या काळात कुटुंब चालवायचे म्हणजे हाताला काम हवेच, अशीच भावना बनली आहे.

अपेक्षा उंचावल्या ...आंबेडकरनगरचे पहिले नगरसेवक महादेव सूर्यवंशी होते. त्यानंतर गौतम लांडगे, शकुंतला इंगळे, कचरू सोनवणे, रामदास बोरडे, भारती सोनवणे अशा लोकप्रतिनिधींचे वॉर्डासाठी योगदान राहिले. सामाजिक बांधीलकी ठेवत घरकुल योजना, शासनाच्या योजनांतून रोजगार वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. वाचनालय, सामाजिक सभागृह अशा योजना राबविल्या आहेत. आंबेडकरनगर, फुलेनगर, गौतमनगरचा परिसर विकासाच्या दिशेने आहे. स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीसाठी युवक- युवती प्रयत्नशील आहेत. खेळावरही लक्ष केंद्रित केले आहे. आत्मविश्वास वाढीस लागल्याचा फायदाच झाला आहे.- माजी नगरसेवक गौतम लांडगे

मेहनतीने नाव केलंशिक्षणाचे धडे देण्यावर भर प्रत्येक कुटुंबातील मुलांना शाळेत आणण्याची मोठी जबाबदारी पार पाडली, त्याच काळात त्यांना विविध क्षेत्रांत तुम्ही तुमचे नाव व करिअर कसे करू शकता, हे सातत्याने बिंबविल्याने युवकांनी मेहनतीने आंबेडकरनगरचे नाव चमकविले आहे. ही वाटचाल आता अशीच पुढे सुरू राहणार आहे.- प्रकाश सोनवणे (मुख्याध्यापक)

उद्योग उभा करता आलाव्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश घेऊन आता वाळूजसारख्या ठिकाणी प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय सुरू करता आला. झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतले. शिक्षणात ही ताकद आहे.- आनंद घोरपडे, उद्योजक

रोजगार मेळावे घेण्यात यावेतशासकीय रोजगाराच्या संधी देण्यासाठी प्रयत्न केले जावेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना देखील तंत्रज्ञान देण्यासाठी पालकांचा अट्टाहास असतो. रोजगार मेळावे घेण्यात यावेत.- चक्रधर मगरे (सामजिक कार्यकर्ता)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका